मुंबापुरीत आता गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. श्रावण आरंभ होत असतानाच रविवारी कुर्ला पश्चिमेकडील सुभाषनगर येथील बाल मित्र मंडळाच्या ‘कुर्ल्याचा राजा’चा दिमाखदार आगमन सोहळा रंगला. मुंबईतील प्रसिद्ध मूर्तिकार राहुल झुंजारराव यांच्या कल्पनेतून कुर्ल्याच्या राजाचे रूप साकारण्यात आले आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दरबारातून या राजाचे आगमन झाले.ढोल-ताशांच्या गजरात रंगलेला हा सोहळा पाहण्यासाठी मुंबईकरांनी रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी केली होती. रविवारी सायंकाळी सर्वेश्वर मंदिरापासून ‘कुर्ल्याच्या राजा’ची मिरवणूक काढण्यात आली. कुर्ल्याच्या राजाचे आगमन चिंचपोकळी येथून होते. प्रथम आगमन सोहळ्याचा मान हा ‘कुर्ल्याच्या राजा’ला मिळतो, अशी माहिती मंडळाचे भूषण गायकवाड यांनी दिली.
मुंबापुरीत आगमन सोहळ्यांचा ‘श्री’ गणेशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 04:30 IST