अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने घ्यायचे की घर ? बांधकाम व्यावसायिकांनीही ऑफर्स आणल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 12:37 IST2025-04-27T12:36:46+5:302025-04-27T12:37:01+5:30

मे महिन्यातील लग्नसराईचा हंगाम पाहता, ग्राहकांचा कल सोने  खरेदीकडे अधिक असू शकतो,  अशी अपेक्षा सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Should you buy gold or a house on Akshaya Tritiya? | अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने घ्यायचे की घर ? बांधकाम व्यावसायिकांनीही ऑफर्स आणल्या

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने घ्यायचे की घर ? बांधकाम व्यावसायिकांनीही ऑफर्स आणल्या

मुंबई : सोन्याच्या भावाने नुकताच प्रति तोळा एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला होता. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांचा कल सोने की चांदी खरेदीकडे अधिक असेल, याबाबत आता सराफ बाजारालाही उत्सुकता लागली आहे. 

मे महिन्यातील लग्नसराईचा हंगाम पाहता, ग्राहकांचा कल सोने  खरेदीकडे अधिक असू शकतो,  अशी अपेक्षा सराफा बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. दुसरीकडे बांधकाम व्यावसायिकांनीही सणासुदीनिमित्त विविध सवलतींच्या ऑफर्स आणल्या आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तशा जाहिरातीही केल्या 
आहेत.  

अमेरिकेने लादलेले ‘टेरिफ’ आणि डॉलरच्या भावातील चढ-उतार यामुळे सोन्याच्या भावाने प्रति तोळा एक लाख रुपयांपर्यंत भरारी घेतली होती. गेल्या महिनाभरापासून सोन्याचा भाव खाली येण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे ग्राहकांची संख्या कमी झाल्याचे सराफांनी सांगितले. 

मध्यंतरी सोन्याचा भाव ५६ हजार रुपये तोळा होईल, अशी अफवा होती. परिणामी, ग्राहक अधिक गोंधळात पडले होते. मात्र, आता सोन्याचा भाव थेट लाखावर पोहोचल्याने झळाळी आल्याचे पाहायला मिळत आहे. 

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हमखास सोने खरेदी केली जाते. सध्या महागाईच्या काळात सोने खरेदी करणे सामान्य नागरिकांना कठीण झाले आहे, परंतु अनेक जण खिशाला परवडेल इतके सोने खरेदी करताना दिसतात, तर अनेकजण गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी करतात. 

समिधा नलावडे, गृहिणी 

अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांनी सोने, कॅशबॅक आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांच्या ऑफर्स आणल्या आहेत. गृहकर्जावर कमी व्याजदर आणि आकर्षक ऑफर्स यामुळे घर खरेदीसाठी सध्याचा उत्तम काळ आहे, अशा जाहिराती अनेकांनी केल्या आहेत.

Web Title: Should you buy gold or a house on Akshaya Tritiya?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.