लालबागमध्ये जमिनीखालील विद्युत वाहिनीने घेतला पेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 12:40 IST2018-09-15T12:35:53+5:302018-09-15T12:40:33+5:30
लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरच असलेल्या ग्यास कंपनी लेनमध्ये शनिवारी शॉर्ट सर्किटची घटना घडली आहे.

लालबागमध्ये जमिनीखालील विद्युत वाहिनीने घेतला पेट
मुंबई - लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरच असलेल्या ग्यास कंपनी लेनमध्ये शनिवारी (15 सप्टेंबर) शॉर्ट सर्किटची घटना घडली आहे. जमिनीखालून जाणाऱ्या विद्युत वाहिनीने पेट घेतल्याने याठिकाणी काही वेळ खळबळ माजली होती. मात्र मुंबई अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
बेस्ट कर्मचारीही या ठिकाणी दाखल झाले आहेत. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीखालून गेलेल्या जुन्या केबलने पेट घेतला होता. मात्र अग्निशामकच्या मदतीने तत्काळ आग विझवली. तसेच मुख्य वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.