मुंबईतील दुकाने यापुढे दिवसभर सुरू राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 05:52 AM2020-06-10T05:52:31+5:302020-06-10T05:52:48+5:30

पालिका आयुक्तांनी काढले सुधारित परिपत्रक

Shops in Mumbai will continue to operate throughout the day | मुंबईतील दुकाने यापुढे दिवसभर सुरू राहणार

मुंबईतील दुकाने यापुढे दिवसभर सुरू राहणार

googlenewsNext

मुंबई : ‘पुनश्च हरिओम’च्या दुसऱ्या टप्प्यात सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देताना सकाळी ९ ते सायंकाळी ५ असे वेळेचे बंधन घालण्यात आले होते. मात्र पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी काढलेल्या सुधारित परिपत्रकात हे निर्बंध आता उठविण्यात आले आहेत. त्यानुसार दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवता येतील, मात्र फिजिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळणे दुकानदारांना बंधनकारक असणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने खुले करण्यात येत आहे. त्यानुसार पुनश्च हरिओमअंतर्गत मुंबईतील मंडई, दुकाने ५ जूनपासून सुरू करण्यात आली आहेत. यामध्ये सम-विषम पद्धत म्हणजे एक दिवस उजवीकडील तर दुसºया दिवशी डावीकडील दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी असल्याने दुकानांची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ५ ही निश्चित करण्यात आली होती. ही वेळ अपुरी असल्याने दुकाने रात्री ८ पर्यंत सुरू ठेवण्याची मागणी व्यापारी संघटनांकडून केली जात होती. ही मागणी मान्य करीत प्रशासनाने वेळेवरील निर्बंध बुधवारपासून उठवले आहेत. मात्र व्यापारी संकुल आणि मॉल्स यापुढेही बंद राहणार आहेत. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातही कोणती सूट मिळणार नाही. तसेच दुकानदारांना सम-विषम पद्धतीनेच दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. दुकानात सुरक्षेची सर्व खबरदारी घ्यावी लागणार आहेत. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर, दुकानात गर्दी टाळावी, रिटर्न पॉलिसी बंद करावी, रविवारी दुकाने बंद ठेवावीत, अशा अटी कायम आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबईकरांना उद्यानात फेरफटका, व्यायाम करण्यास परवानगी मिळाली. मात्र व्यायामाची साधने वापरायला परवानगी देण्यात आलेली नाही.

खासगी कार्यालयात १० टक्केच हजेरी
च्खासगी कार्यालयात १० टक्के उपस्थिती किंवा १० कर्मचारी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली होती. हाच नियम यापुढेही कायम ठेवण्यात आला आहे. दहापेक्षा जास्त कर्मचारी असल्यास त्यांना घरून काम करण्याची अनुमती द्यावी.
च्तर कार्यालयात येणाºया कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची सर्व जबाबदारी ही मालकाची असणार आहे. तसेच कर्मचारी घरी परतताना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सॅनिटायझिंगचे प्रशिक्षण त्यांना दिले जावे, अशी सूचना पालिकेने खासगी कार्यालयांना केली आहे.

Web Title: Shops in Mumbai will continue to operate throughout the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई