Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 16:22 IST2025-11-08T16:20:57+5:302025-11-08T16:22:31+5:30

Mumbai Cooper Hospital News: मुंबईतील कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना समोर आली.

Shocking: Relatives of Deceased Patient Assault Three Doctors at Cooper Hospital, Mumbai | Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण

Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण

मुंबईतील डॉ. आर.एन. कूपर रुग्णालयात शुक्रवारी रात्री एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. रुग्णालयाच्या कॅज्युअल्टी विभागात मृत रुग्णाच्या नातेवाईकाने तीन डॉक्टरांना मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद कैद झाला. ही घटना वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

कूपर रुग्णालयातील डॉक्टरने वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की, एका महिला रुग्णाला रात्री १२:२२ ते १२:३२ च्या दरम्यान गंभीर अवस्थेत आपत्कालीन विभागात आणले गेले. आम्ही तातडीने प्रोटोकॉलनुसार कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन म्हणजेच सीपीआर द्यायला सुरुवात केली. परंतु, दुर्दैवाने रुग्णाला वाचवता आले नाही. रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकाला दिल्यानंतर त्याने रुग्णालयात गोंधळ घालायला सुरुवात केली. तसेच रुग्णालयातील कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर, निवासी डॉक्टर आणि आपत्कालीन वॉर्डमधील एका इंटर्न यांना मारहाण केली.

या घटनेनंतर रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Web Title : मुंबई: कूपर अस्पताल में मृत रोगी के रिश्तेदार द्वारा डॉक्टरों पर हमला

Web Summary : मुंबई के कूपर अस्पताल में एक मृत रोगी के रिश्तेदार ने तीन डॉक्टरों पर हमला किया। सीसीटीवी में कैद हुई इस घटना ने स्वास्थ्य कर्मियों की सुरक्षा पर सवाल खड़े कर दिए हैं। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Mumbai: Doctors Assaulted by Relative of Deceased Patient at Cooper Hospital

Web Summary : A relative of a deceased patient assaulted three doctors at Mumbai's Cooper Hospital. The incident, captured on CCTV, raises concerns about healthcare worker safety. Police are investigating the matter.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.