धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 08:49 IST2026-04-08T08:48:49+5:302026-04-08T08:49:09+5:30

नियमित सफाई नसल्याने त्यात शेवाळे आणि झुडुपे

Shocking reality! Check out the 'swimming pool' in Mumbai University's sports complex | धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’

धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’

अमर शैला, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील क्रीडा संकुलातील जलतरण तलाव गेल्या अनेक वर्षांपासून बंद असून, तो  पुन्हा सुरू करण्यासाठी विद्यापीठाने राज्य सरकारकडे निधी देण्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, हा निधी मिळून या जलतरण तलावाची दुरुस्ती नक्की कधी होणार, हे अनिश्चित आहे. 

या बंद असलेल्या तलावाकडे विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष असून, त्यात पावसाचे पाणी भरते. नियमित सफाई नसल्याने त्यात शेवाळे आणि झुडुपे आली आहेत. लाखो रुपये खर्चून उभारलेल्या या तलावाची देखभाल-दुरुस्ती नियमित होत नाही. त्यामुळे जगातील नावाजलेल्या मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांना जलतरण तलावाची सुविधा उपलब्ध होत नाही. 

हा तलाव दुरुस्त करून विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून द्यावी, ही मागणी आम्ही गेली अनेक वर्षे करीत आहोत, असे युवा सेना नेते आणि सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितले. या तलावाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले असून, त्यांच्या अहवालानुसार दुरुस्ती करण्यात येईल. त्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title : चौंकाने वाला सच: मुंबई विश्वविद्यालय का स्विमिंग पूल जर्जर हालत में!

Web Summary : मुंबई विश्वविद्यालय का स्विमिंग पूल सालों से बंद है, उपेक्षित है और बारिश के पानी, शैवाल और खरपतवार से भरा है। छात्रों के अनुरोधों और संरचनात्मक ऑडिट के बावजूद, मरम्मत राज्य सरकार के धन की प्रतीक्षा कर रही है। छात्र सुविधा से वंचित हैं।

Web Title : Shocking Reality: Mumbai University's Swimming Pool in Dilapidated Condition!

Web Summary : Mumbai University's swimming pool is shut for years, neglected and filled with rainwater, algae, and weeds. Despite student requests and structural audits, repairs are pending state government funding. Students are deprived of the facility.