Mumbai Crime:मुंबईच्या लोकल प्रवासादरम्यान माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हार्बर मार्गावरील जी टी बी नगर रेल्वे स्थानकावर एका अज्ञात नराधमाने ११ वर्षांच्या निष्पाप मुलाला उचलून थेट प्लॅटफॉर्मवर आपटले. या हल्ल्यात हा मुलगा गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार शीला पवार (वय ६०) या आपल्या नातेवाईकांसह आणि तीन अल्पवयीन मुलांसह कुर्ला येथून लोकलने पेन विकण्यासाठी निघाल्या होत्या. १४ मार्च रोजी दुपारी ३:१० च्या सुमारास हे सर्वजण जी टी बी नगर स्थानकावर उतरले. सर्वजण वेगवेगळ्या डब्यातून उतरल्याने प्लॅटफॉर्मवर एकमेकांना शोधत होते. त्याच वेळी शीला यांच्यासोबत असलेल्या एका मुलाने धावत येऊन त्यांना सांगितले की, एका अज्ञात माणसाने त्यांच्या नातवाला उचलून जोरात प्लॅटफॉर्मवर आपटले आहे.
चिमुरडा प्लॅटफॉर्मवर बेशुद्ध
शीला पवार तातडीने नातवाच्या दिशेने धावल्या, तेव्हा त्यांना तो रक्ताच्या थारोळ्यात आणि बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसला. घटनेचे गांभीर्य पाहून उपस्थित प्रवाशांनी त्या अज्ञात हल्लेखोराला पकडले होते. मात्र, नातवाची प्रकृती चिंताजनक असल्याने शीला यांनी हल्लेखोराकडे लक्ष न देता आधी नातवाला घेऊन रुग्णालय गाठले. सध्या या चिमुरड्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
वडाळा रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या व्यक्तीने इतक्या लहान मुलावर इतका भीषण हल्ला का केला? याचा शोध पोलीस घेत आहेत.
मुलुंडमध्ये पत्नीला थेट लोकल रेल्वेसमोर ढकलले
घरगुती भांडणातून पतीने पत्नीला रेल्वे समोर ढकलल्याची घटना मुलुंड स्थानकात घडली. वादानंतर संतापलेल्या पतीने कल्याणकडे जाणाऱ्या लोकलसमोर पत्नीला ढकलून दिले. या घटनेत पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Web Summary : In Mumbai, a shocking incident occurred at GTB Nagar station where an unknown assailant attacked an 11-year-old boy, leaving him critically injured. Police are investigating the attempted murder. Separately, in Mulund, a man pushed his wife in front of a train, resulting in her death.
Web Summary : मुंबई के जीटीबी नगर स्टेशन पर एक अज्ञात व्यक्ति ने 11 वर्षीय लड़के पर हमला किया, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गया। पुलिस हत्या के प्रयास की जांच कर रही है। अलग से, मुलुंड में, एक आदमी ने अपनी पत्नी को ट्रेन के आगे धकेल दिया, जिससे उसकी मौत हो गई।