मुंबईतील तरुणीसोबत धक्कादायक प्रकार; व्हिडीओ कॉलवर विवस्त्र व्हायला सांगितलं आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 15:54 IST2024-12-01T15:54:09+5:302024-12-01T15:54:32+5:30
फसवणूक करणाऱ्यांनी अनेक फोन नंबर वापरून तिला अटक करण्याची धमकी दिली आणि आभासी चौकशीसाठी तिला हॉटेलची खोली बुक करण्यास भाग पाडले.

मुंबईतील तरुणीसोबत धक्कादायक प्रकार; व्हिडीओ कॉलवर विवस्त्र व्हायला सांगितलं आणि...
मुंबई : एका २६ वर्षीय तरुणीला व्हिडीओ कॉलच्या दरम्यान जबरदस्तीने विवस्त्र करण्यात आले, तसेच पोलिस अधिकारी असल्याचे भासविणाऱ्या भामट्यांनी डिजिटल अटक घोटाळ्यात तिची १७८ लाख रुपयांची फसवणूक केली.
पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरनुसार, ही घटना १९ ते २० नोव्हेंबरच्या दरम्यान घडली. एका फार्मास्यूटिकल कंपनीत काम करणाऱ्या या तरुणीला दिल्लीतील पोलिस अधिकारी असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा फोन आला. त्यांनी तिच्यावर उद्योगपती नरेश गोयल यांच्याशी संबंधित मनी लॉड्रिंग प्रकरणात सहभाग असल्याचा खोटा आरोप लावला, फसवणूक करणाऱ्यांनी अनेक फोन नंबर वापरून तिला अटक करण्याची धमकी दिली आणि आभासी चौकशीसाठी तिला हॉटेलची खोली बुक करण्यास भाग पाडले. व्हिडीओ कॉलच्या दरम्यान, गुन्हेगारांनी महिलेला बैंक खाते पडताळणीसाठी १.७८ लाख रुपये ट्रान्सफर करायला लावत फसविले. त्यानंतर, त्यांनी बॉडी चेकिंगच्या बहाण्याने तिला कपडे उतरविण्यास भाग पाडले.
दरम्यान, पीडितेने २८ नोव्हेंबर रोजी या घटनेची तक्रार केली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.