Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 09:59 IST2025-12-22T09:50:54+5:302025-12-22T09:59:37+5:30
Mumbai Local Train Crime: मुलीला चालत्या लोकलमधून बाहेर फेकल्याची ही घटना घडली. काहींनी मोबाईल कॅमेऱ्यात हा प्रकार कैद केला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
मुंबई - शहराची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने महिला डब्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पनवेल-सीएसएमटी रेल्वे रुळावर एका मुलीला चालत्या रेल्वेतून बाहेर फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे महिलांमध्ये असुरक्षित भावना निर्माण झाली असून घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती पुढे आली आहे.
लोकलच्या महिला डब्ब्यात एक पुरुष चढला होता. या पुरुषाला खाली उतरण्याची विनंती करणाऱ्या महिलेसोबत पुरुषाने वाद घातला. त्या वादात या पुरुषाने महिलेला चालत्या लोकलमधून खाली फेकले. पनवेल-सीएसएमटी लोकलमध्ये ५० वर्षीय पुरुष प्रवासी चढला होता. एका १८ वर्षीय मुलीने या प्रवासाला डब्ब्यातून उतरण्याची विनंती केली होती. मात्र आरोपी पुरुषाने मुलीला खाली लोकलमधून खाली फेकले. ही मुलगी जखमी झाली असून तिच्यावर उपचार करण्यात आले आहे. या घटनेतील आरोपी शेख अख्तर नवाजला जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?
१८ डिसेंबर रोजी एका मुलीला चालत्या लोकलमधून बाहेर फेकल्याची ही घटना घडली. काहींनी मोबाईल कॅमेऱ्यात हा प्रकार कैद केला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेवेळी काही सतर्क रेल्वे प्रवाशांनी लेडिज डब्ब्यात चढून संबंधित आरोपी पुरुषाला चोप देत बाहेर काढले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला कोर्टासमोर हजर केले तिथे त्याला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महिला डब्ब्यात चढणाऱ्या या पुरुष प्रवाशाला खाली उतरण्यास सांगितल्याचा राग या पुरुषाला आला. या रागाच्या भरात त्याच्या समोर एक तरूणी उभी होती तिला चालत्या रेल्वेतून धक्का देत खाली ढकलले. ती तरुणी रेल्वे रुळावर पडली होती. या जखमी अवस्थेत तिने तिच्या वडिलांना कॉल करून संबंधित घटना सांगत ती कुठे पडली आहे हे सांगितले. त्यानंतर कुटुंबाने तिला शोधून रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र रात्री उशिरा नव्हे तर भरदिवसा घडलेल्या संबंधित घटनेमुळे महिला डब्यातील सुरेक्षाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.