धक्कादायक! छेडछाडीला विरोध केला म्हणून मुंबईत बेशुद्ध होईपर्यंत तरुणीला बेदम मारहाण, लोकांची बघ्याची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 17:43 IST2017-10-21T17:38:39+5:302017-10-21T17:43:44+5:30
छेडछाडीचा जाब विचारला म्हणून एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीला सर्वांसमक्ष बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे.

धक्कादायक! छेडछाडीला विरोध केला म्हणून मुंबईत बेशुद्ध होईपर्यंत तरुणीला बेदम मारहाण, लोकांची बघ्याची भूमिका
मुंबई - छेडछाडीचा जाब विचारला म्हणून एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीला सर्वांसमक्ष बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना मुंबईत घडली आहे. कुर्ला नेहरुनगर येथे मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सर्वांसमक्ष तरुणीला मारहाण करत होता. अनेकजण ही घटना पाहत होते. पण कोणीही मध्ये हस्तक्षेप करुन या तरुणीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.
ही तरुणी बेशुद्ध होऊन खाली कोसळेपर्यंत तिला मारहाण करण्यात आली. मंगळवारी संध्याकाळी ही तरुणी नेहमीप्रमाणे तिच्या मैत्रिणीसोबत शिलाईच्या शिकवणी वर्गाला जात होती. त्यावेळी त्याच इमारतीत राहणा-या इमरान शाहीद शेखने तिला पाहून एक कमेंट केली. तरुणीला त्याचे शब्द ऐकून राग आला तिले त्याला जाब विचारला. त्यावर चिडलेल्या इमरानने तिच्या कानाखाली मारली तसेच तिला बुक्के मारले. तरुणी बेशुद्ध होऊन खाली कोसळेपर्यंत इमरानने तिला मारहाण केली.
अनेकजण ही घटना पाहत होते. पण कोणीही मध्येपडले नाही. अखेर या तरुणीसोबत असलेल्या तिच्या मैत्रिणीने तिच्या आई-वडिलांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी तिला लगेच जवळच्या रुग्णालयात नेले. त्यानंतर तिला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकाने हा सर्व प्रकार पाहून मी भांबावून गेलो. मला भिती वाटली असे सांगितले. मुलीच्या आई-वडिलांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपीने आपली छेड काढली. आपण जेव्हा त्याला जाब विचारला तेव्हा त्याने मारहाण केली असे सांगितले.