धक्कादायक! मुंबईच्या मॉलमध्ये पाण्यावर तरंगताना दिसला तरुणीचा मृतदेह, घातपाताचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 12:59 IST2025-01-21T12:58:21+5:302025-01-21T12:59:17+5:30

काही लोकांना मॉलच्या बेसमेंटमध्ये असणाऱ्या पाण्यावर एक मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले.

Shocking Body of young woman found floating in water in Mumbai mall | धक्कादायक! मुंबईच्या मॉलमध्ये पाण्यावर तरंगताना दिसला तरुणीचा मृतदेह, घातपाताचा संशय

धक्कादायक! मुंबईच्या मॉलमध्ये पाण्यावर तरंगताना दिसला तरुणीचा मृतदेह, घातपाताचा संशय

Mumbai Dream Mall: मुंबईतील भांडुप परिसरात असणाऱ्या ड्रीम मॉलमध्ये एका ३० ते ३५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे. सकाळी १० वाजताच्या सुमारास काही लोकांना मॉलच्या बेसमेंटमधील पाण्यावर एक मृतदेह तरंगत असल्याचे आढळून आले. याबाबतची माहिती तातडीने पोलिसांना कळवण्यात आली. त्यानंतर सदर तरुणीला मुलुंडमधील जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

भांडुपमधील ड्रीम मॉल मागील अनेक वर्षांपासून बंद आहे. आगीच्या घटनेत जळून खाक झाल्यापासून हा मॉल बंद अवस्थेत आहे. त्यामुळे सदर मॉलमध्ये यापूर्वीही अनेकदा अनुचित घटना घडल्या आहेत. अशातच आता पुन्हा एकदा एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आल्याने ड्रीम मॉलमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवावी, अशी मागणी समोर येऊ लागली आहे.

दरम्यान, मृतावस्थेत आढळलेल्या तरुणीची ओळख अद्याप पटू शकली नसून पोलिसांकडून सदर तरुणीच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात आहे. तसंच या तरुणीची हत्या करण्यात आली की तिने आत्महत्या केली, याबाबतही अधिक तपास भांडुप पोलीस करत आहेत. 

Web Title: Shocking Body of young woman found floating in water in Mumbai mall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.