Coronavirus: धक्कादायक! कल्याणमधील 3 वर्षांची मुलगी कोरोना ‘पॉझिटिव्ह’; वडिलांमुळे झाला संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 01:51 PM2020-03-17T13:51:19+5:302020-03-17T13:54:53+5:30

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या राज्यात 39वर गेली असून, यात एका तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.

Shocking! 3-year-old daughter Corona 'positive' in Kalyan; Infection caused by father vrd | Coronavirus: धक्कादायक! कल्याणमधील 3 वर्षांची मुलगी कोरोना ‘पॉझिटिव्ह’; वडिलांमुळे झाला संसर्ग

Coronavirus: धक्कादायक! कल्याणमधील 3 वर्षांची मुलगी कोरोना ‘पॉझिटिव्ह’; वडिलांमुळे झाला संसर्ग

Next
ठळक मुद्देजगभरासह देशात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसमुळे मुंबईत एका 64 वर्षीय व्यक्तीचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या राज्यात 39वर गेली असून, यात एका तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे.कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या 33 वर्षीय पत्नी व तीन वर्षांच्या चिमुकलीची 14 मार्च रोजी तपासणी करण्यात आली होती, त्याचा अहवाल सोमवारी आला असून, त्या दोघींनाही कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे.

मुंबईः जगभरासह देशात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसमुळे मुंबईत एका 64 वर्षीय व्यक्तीचा कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या राज्यात 39वर गेली असून, यात एका तीन वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. कल्याण येथे कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाच्या 33 वर्षीय पत्नी व तीन वर्षांच्या चिमुकलीची 14 मार्च रोजी तपासणी करण्यात आली होती, त्याचा अहवाल सोमवारी आला असून, त्या दोघींनाही कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे.

दरम्यान भांडुप येथील स्थानिक असलेली 44 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. सध्या कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे 14 रुग्ण दाखल असून, त्यात मुंबईतील 6 आणि मुंबईबाहेरील 8 रुग्णांचा समावेश आहे. भांडुप येथील महिला 13 मार्चला पोर्तुगालहून मुंबईत आली. 16 मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल झाली, तिचा वैद्यकीय अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. तिच्या सहवासात आलेल्या दोन निकटवर्तीयांनाही 14 दिवसांकरिता विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याचे पालिकेच्या उपकार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.

कस्तुरबा रुग्णालयात दाखल रुग्णांची आकडेवारी

एकूण भरती झालेले संशयित रुग्ण 498
नकारात्मक अहवाल असलेल्या रुग्णांची संख्या 452
सोमवारपर्यंत पॉझिटिव्ह आलेले रुग्ण 6
सोमवारपर्यंत डिस्चार्ज झालेले रुग्ण 433
सोमवारपर्यंत बाह्यरुग्ण विभागात आलेले रुग्ण 1865
सोमवारपर्यंत रुग्णालयात भरती झालेले रुग्ण 65

Web Title: Shocking! 3-year-old daughter Corona 'positive' in Kalyan; Infection caused by father vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.