पश्चिम उपनगरात ठाकरे गटाला धक्का; माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे यांचा शिंदे गटात प्रवेश
By मनोहर कुंभेजकर | Updated: June 4, 2023 19:50 IST2023-06-04T19:50:38+5:302023-06-04T19:50:45+5:30
यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पश्चिम उपनगरात ठाकरे गटाला धक्का; माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे यांचा शिंदे गटात प्रवेश
मुंबई- पश्चिम उपनगरातील कांदिवली पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक २८, हनुमान नगर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक एकनाथ शंकर हुंडारे यांनी आपल्या असंख्य साथीदारांसोबत दि,2 जून रोजी रात्री ठाणे येथील महापौर निवास्थानात झालेल्या प्रवेश कार्यक्रमात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
राज्यातील युती सरकार हे मुंबईत अनेक सकारात्मक बदल करत असून या शहराचे स्वरूप बदलून मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर वाटावे यासाठी प्रयत्न करत असून सार्वजनिक स्वच्छता, सुशोभीकरण यांना महत्व देण्यात आले आहे असे यासमयी नमूद केले. हनुमान नगर परिसरातील अनेक प्रश्न प्रलंबित असून महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या सहयोगाने हे प्रश्न नक्की सोडवू अशी यावेळी मुख्यमंत्र्यांनी ठाम ग्वाही देत या सर्वांना आश्वस्त केले.
याप्रसंगी शिवसेना सचिव कॅप्टन. अभिजित अडसूळ, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना महाराष्ट्र राज्य समन्वयक व प्रवक्ते नरेश म्हस्के तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.