शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती ठीक नसल्याची माहिती समोर आली होती. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही महिने सार्वजनिक जीवनातून दूर राहावं लागणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यावेळी नेमकं काय झालं होतं याचा खुलासा आता संजय राऊत यांनी स्वत:च केला आहे. कॅन्सरचं निदान झाल्याचं सांगितलं आहे.
“दिवाळीच्या दोन-चार दिवस आधी कॅन्सरचं अचानक निदान झालं. त्याआधी आपण दौरे करतो, प्रवास करतो. कुठेतरी उशिरा पोहोचतो, उशिरा झोपतो म्हणून त्रास झाला असेल, असं आधी मला वाटलेलं. पण माझा भाऊ आमदार सुनिल राऊत याला काय वाटलं माहीत नाही. पण त्याने माझं रक्त चेक करण्यासाठी बोलावलं. तेव्हा निदान झालं की मला पोटात कॅन्सर आहे.”
"ऐन दिवाळीत किमोथेरपी, रेडिएशन"
"मला जेव्हा सांगितलं तेव्हा मी हसलो नेहमीप्रमाणे, म्हटलं ठीक आहे. पण कुटुंबाने सांगितलं की, उद्याच मला एडमिट व्हावं लागेल. मी म्हटलं, असं कसं शक्य आहे. सगळं शेड्युल आहे. पण कुटुंबाने ऐकलं नाही. त्यांनी ऐन दिवाळीत किमोथेरपी, रेडिएशन दिलं. हे फार यातनादायी उपचार होते.”
"दीड महिना मी जवळजवळ बंदिस्तच होतोच"
"आजारापेक्षा उपचार भयंकर असतात. दीड महिना मी जवळजवळ बंदिस्तच होतो. कधी घरी, कधी रुग्णालयात होतो. खूप अडचणी असतात. पाणीही पिता येत नाही. इतका त्रास असतो, पण यातून मी बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या कट्टा या कार्यक्रमात राऊत यांनी कॅन्सरबद्दल सांगितलं आहे.
Web Summary : Shiv Sena leader Sanjay Raut revealed he was diagnosed with cancer just before Diwali. He underwent chemotherapy and radiation, describing the treatment as painful and restrictive. Raut is now recovering.
Web Summary : शिवसेना नेता संजय राउत ने खुलासा किया कि उन्हें दिवाली से ठीक पहले कैंसर का पता चला था। उन्होंने कीमोथेरेपी और विकिरण करवाया, इलाज को दर्दनाक और प्रतिबंधात्मक बताया। राउत अब ठीक हो रहे हैं।