Shiv Sena's Dussehra Melawa is a flop show on OTT platform, Ashish Shelar's Tola | शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा फ्लॉप शो, आशिष शेलारांचा टोला

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा फ्लॉप शो, आशिष शेलारांचा टोला

मुंबई - पत्रकार अर्णब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनाैत यांनी शिवसेनेबद्दल जे वक्तव्य केले त्याचे दडपण, रा. स्व. संघाच्या आड स्वत:ला लपवून घेणे आणि भाजपच्या ताकदीची दहशत किती वाटते हे सगळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रविवारच्या दसरा मेळाव्यातील भाषणात दिसले, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी सोमवारी पत्रपरिषदेत व्यक्त केली.
ते म्हणाले, शिवसेनेचा महाविजयी मेळावा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा फ्लॉप शो होता. ठाकरे यांना त्यांची सत्ता टिकेल याविषयी शंका आहे. त्यामुळेच ते एकसारखे सरकार पाडून दाखवा, अशी ओरड करतात. पण आमच्या नेत्यांनी आधीच सांगितले आहे की, हिंमत असेल तर सरकार चालवून दाखवा. पण आता तर हिंमत असेल तर बाहेर उतरून दाखवा, असे म्हणायची वेळ आली आहे. धर्माच्या नावाखाली सरकार पाडण्याचा प्रयत्न, असा आता नवीन आरोप केला जातो. पण जे सरकार कर्माने पडणार आहे ते धर्माने पाडायची गरज नाही, असे शेलार म्हणाले.

English summary :
Ashish Shelar says, Shiv Sena's Dussehra Melawa is a flop show on OTT platform.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shiv Sena's Dussehra Melawa is a flop show on OTT platform, Ashish Shelar's Tola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.