"Shiv Sena will come to power in Mumbai Municipal Corporation too" | "मुंबई महापालिकेतही शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता येईल"

"मुंबई महापालिकेतही शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्ता येईल"

मुंबई -  शिवसेनेच्या नेतृत्वाखालील काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सरकार राज्यात   मजबुतीने उभे आ्हे. राजकीय व्यवस्थेत आता बदल होणार नाही. ते चिरंतन राहील. देशाची  आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीतही शिवसेनेच्या  नेतृत्वाखालीच सता असेल, असा  दावा शिवसेनेते नेते, खासदार संजय  राऊत यांनी रविवारी केला. त्यामुळे  आगामी पालिका निवडणुका महाविकास आघाडी 
 एकत्र लढणार असल्याची नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झाली. 

शिवसेनेचा दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी माध्मांसमोर विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, मागील दसरा मेळाव्यात मी  आगामी मुख्यमंत्री  शिवसेनेचाच असेल, असं म्हटले होते. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आ्हेत.  त्यावेळी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार ११ दिवसही टिकणार नाही, असा दाव विरोधक करत होते. गणपतीला सरकार पडेल म्हणणारे आता
दिवाळीनंतरच्या तारखा दिल्या जात आहेत. पण, त्यांचे मनसुबे पूर्ण  होणार नाहीत. आमचे फटाके तयार आहेत. विरोधकांच्या खालीच  बाँब फुटतील, त्या साठीची पण तयारी झाली आहे, असं राऊत म्हणाले.

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेचीच सत्ता येणार.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  कोरोनाबाधित झाले आहेत. त्यांना वारंवार सांगत
होतो काळजी घ्या. कोरोना कोणालाही  सोडत नाही. लसीचं राजकारण करण्या इतक्या कोत्या मनोवृत्तीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाहीत.असेही ते म्हणाले. कोरोनाचे संकट नसते तर शिवाजी पार्क अपुरे पडले असते.  आम्ही नियम पाळतो. बिहारमध्ये ५० हजार लोकांचे मेळावे चालले आहेत.  जनाची  मनाची आहे म्हणूनच मेळावा यंदा सभागृहात घेतला आ्हे, असे त्यांनी सुनावले. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: "Shiv Sena will come to power in Mumbai Municipal Corporation too"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.