Join us

शिवसेना एकनाथ शिंदेंनी नव्हे, अमित शाहांनी फोडली: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 06:24 IST

अमित शाह यांच्या माध्यमातून हा पक्ष फोडण्यात आला. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शिवसेना एकनाथ शिंदे यांनी फोडली हे खोटं आहे. खरे म्हणजे शिवसेना पक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी फोडला, भाजपने फोडला आहे. त्यांनी सत्तेचा गैरवापर केला. एकनाथ शिंदेंमध्ये काहीच ताकद नव्हती, असा दावा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी केला.

राऊत पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे फार तर ७-८ लोक घेऊन जाऊ शकत होते. त्यांची क्षमता तेवढीच होती. १२-१३ जणांवर ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्सचे खटलेच सुरू होते. अनेक खासदारांवर विविध खटले सुरू होते. या सर्वांचा वापर करून अमित शाह यांच्या माध्यमातून हा पक्ष फोडण्यात आला. 

 

टॅग्स :संजय राऊतअमित शाह