वांद्र्यात उद्धवसेना-भाजप आमनेसामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:31 IST2025-11-15T11:30:37+5:302025-11-15T11:31:03+5:30
Mumbai News: वांद्रे येथील हॉटेल ताज लॅण्ड्स एन्ड हॉटेलबाहेर उद्धवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी मोठी वादावादी झाली. उद्धवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांची फसवणूक करून त्यांना भाजपप्रणीत अखिल भारतीय कर्मचारी संघात दाखल करण्यात येत असल्याचा केल्याचा आरोप उद्धवसेनेचे आ. अनिल परब यांनी केला.

वांद्र्यात उद्धवसेना-भाजप आमनेसामने
मुंबई - वांद्रे येथील हॉटेल ताज लॅण्ड्स एन्ड हॉटेलबाहेर उद्धवसेना व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शुक्रवारी मोठी वादावादी झाली. उद्धवसेनेच्या भारतीय कामगार सेनेच्या कामगारांची फसवणूक करून त्यांना भाजपप्रणीत अखिल भारतीय कर्मचारी संघात दाखल करण्यात येत असल्याचा केल्याचा आरोप उद्धवसेनेचे आ. अनिल परब यांनी केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हॉटेल ताज लॅण्ड्स एन्ड हॉटेलच्या नव्या युनियनच्या फलकाचे अनावरण बुधवारी करण्यात आले. 'कामगार नसतानाही जबरदस्तीने ही नवी युनियन स्थापन करण्यात आली. दबाव टाकून कामगारांच्या सह्या घेण्यात आल्या', असा आरोप करत उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या गेटवर आंदोलन छेडले. भाजपचेही कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने जमल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.
आ. परब यांच्या आगमनानंतर येथील वातावरण अधिक तापले. भाजपच्या प्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी कार्यकर्त्यासह हॉटेलमध्ये जाण्यास निघाले. पोलिसांनी त्यांना अडवून काही नेत्यांनाच चर्चेसाठी आत जाण्याची परवानगी दिली. त्यामुळे कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले. भाजपच्या नव्या युनियनचे फॉर्म भरण्यासाठी कामगारांवर दबाव आणला जात असून नोकरीवरून काढण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप आ. परब यांनी यावेळी केला.