Shiv Sena Twitter war against Amrita Fadnavis | अमृता फडणवीस विरुद्ध शिवसेना ट्विटरयुद्ध

अमृता फडणवीस विरुद्ध शिवसेना ट्विटरयुद्ध

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस विरुद्ध शिवसेना असे टिष्ट्वटरयुद्ध रंगले आहे.अमृता फडणवीस यांनी सोमवारी दुपारी एक टिष्ट्वट केले. ‘सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास ज्या पद्धतीने हाताळला जात आहे, त्यावरून मला असे वाटते की मुंबईने माणुसकीच गमावली आहे. निष्पाप, स्वाभिमानी नागरिकांसाठी मुंबईत राहणे अजिबात सुरक्षित नाही,’ असे टिष्ट्वट त्यांनी केले.

त्यावर युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी आक्षेप घेतला. ‘मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांचे सुरक्षा कवच घेऊन त्यांच्यावरच इतके नीच आरोप करता? सोडून द्या की हे सुरक्षा कवच भरोसा नसेल तर !!' असे टिष्ट्वट वरुण सरदेसाई यांनी केले. शिवाय, ‘याच मुंबई पोलिसांच्या ‘उमंग’ कार्यक्रमात नाचलात-गायलात. किती कृतघ्न होणार?’ अशी टीका करून मुंबई पोलिसांवर आमचा विश्वास असल्याचे हॅशटॅगही जोडले. वरुण सरदेसाई यांच्या टिष्ट्वटनंतर दोन्ही बाजंूनी एकमेकांवर आरोप करणाऱ्या टिष्ट्वटचा भडिमार सुरू झाला.

मुंबईत राहणे अजिबात सुरक्षित नाही

‘मुंबईत राहणे अजिबात सुरक्षित नाही,’ असे टिष्ट्वट अमृता फडणवीस यांनी केले. यात सुशांतसिंह राजपूत व दिशा सालियनला न्याय मिळायला हवा, असा हॅशटॅगही टाकला.

मॅडम, मग पोलीस संरक्षण का घेता?
‘मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांचे सुरक्षा कवच घेऊन त्यांच्यावरच इतके नीच आरोप करता? सोडून द्या की हे सुरक्षा कवच भरोसा नसेल तर !!’ असे टिष्ट्वट युवासेना सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी केले.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Shiv Sena Twitter war against Amrita Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.