शिवसेना सचिवपदी कॅप्टन अभिजीत अडसूळ; एकनाथ शिंदेंनी केली नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 22:08 IST2022-10-03T22:08:02+5:302022-10-03T22:08:21+5:30
आज मुख्यमंत्र्यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.

शिवसेना सचिवपदी कॅप्टन अभिजीत अडसूळ; एकनाथ शिंदेंनी केली नियुक्ती
मुंबई-राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅप्टन अभिजीत अडसूळ यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती केली.
आज मुख्यमंत्र्यांनी त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत उपस्थित होते. अडसूळ यांनी यापूर्वी आमदार तसेच विभागप्रमुखपद भूषवले आहे.शिंदे गटाचे शिवसेना नेते व माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे ते चिरंजीव आहेत.