Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सर्व काही भोगून, प्राप्त करून गजानन किर्तीकर शिंदे गटात गेले, उद्या पासून लोक त्यांना विसरतील"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 12:13 IST

गजानन आमचे ज्येष्ठ सहकारी होते. आता त्यांनी पक्ष सोडला आहे. ते पाचवेळा आमदार, दोनवेळा खासदार राहिले. त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर मात्र आमच्यासोबत राहिले आहेत.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना नेते गजानन किर्तीकर यांनी शिदें गटात म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. अगोदरच शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार संजय राऊत यांनी आज किर्तीकर यांच्यावर टीका केली.

गजानन आमचे ज्येष्ठ सहकारी होते. आता त्यांनी पक्ष सोडला आहे. ते पाचवेळा आमदार, दोनवेळा खासदार राहिले. त्यांचे पुत्र मात्र आमच्यासोबत राहिले आहेत. किर्तीकरांसारखे नेते जेव्हा पक्ष सोडून जातात तेव्हा लोकांच्या मनात एक वेगळी भावना निष्ठा यासाठी होते. ते गेल्यामुळे फार काही नुकसान झालेले नाही. उद्यापासून त्यांना लोक विसरतील, असंही संजय राऊत म्हणाले. 

गजानन किर्तीकर मंत्रिपद सुद्धा दिले. त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर पक्षासोबत राहिले आहेत. ते कडवट शिवसैनिक आहेत. आमच्या पक्षाला कोणताही धक्का नाही. त्यांची दिशा बरोबर आहे की चुकीची हे जनता ठरवते. अंधेरीमध्ये काय झाले आपण पाहिले आहे. पोटनिवडणुकीत जनतेचा कौल सर्वांना कळाला आहे. किर्तीकर यांनी केलेल्या न्यायाच्या टीकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले, न्यायाची व्याख्या काय आहे, मला मला तर तुरुंगातही टाकले मी पक्ष सोडला नाही, असंही संजय राऊत म्हणाले.   

टॅग्स :संजय राऊतशिवसेनागजानन कीर्तीकर