Join us

Sanjay Raut : "बाळासाहेबांची व्यंगचित्रकला पुढे जाईल असं वाटलं होतं, पण...", संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 12:05 IST

Shiv Sena MP Sanjay Raut Slams Raj Thackeray on world Cartoonist day : जागतिक व्यंगचित्रकला दिनाचं निमित्त साधून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपावर निशाणा साधला आहे.

मुंबई जागतिक व्यंगचित्रकला दिनाचं निमित्त साधून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray आणि भाजपावर BJP निशाणा साधला आहे. बाळासाहेबांची व्यंगचित्रकला राज ठाकरेंच्या माध्यमातून पुढे जाईल असं वाटलं होतं पण भाजपानं राज ठाकरेंमधील कलेचा गळा घोटला, असा टोला संजय राऊत  Sanjay Raut यांनी लगावला. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

"आज जागतिक व्यंगचित्रकार दिन आहे. जेव्हा सोशल मीडिया, टेलिव्हिजन नव्हते त्याकाळात एडिटर आणि व्यंगचित्रकारांची ताकद होती. १०० संपादकीयमध्ये जी ताकद नाही ती एका कार्टुनमध्ये होती. बाळासाहेब ठाकरेंनीही आपल्या कुंचल्यातून वेळोवेळी राजकीय परिस्थितीवर भाष्य करुन समाज प्रबोधनाचं काम केलं आहे. एका कार्टुनच्या माध्यमातून मोठ मोठे हुकूमशाह झुकल्याचं आपण पाहिलं आहे. पण बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ज्यांच्यामध्ये कार्टुनिस्टची क्षमता वाटत होती. पण त्यांनी मशिदीवरील भोंग्यांचं राजकारण सुरू केलं आणि ते आता हिंदुच्याच गळ्याशी आलं आहे. भाजपाने आज एका व्यंगचित्रकाराचा गळा घोटला", असं संजय राऊत म्हणाले. "बाळासाहेबांची व्यंगचित्राची कला पुढे जाईल असं वाटलं होतं. पण भाजपानं त्या कलेचा गळा घोटला", असा टोला राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे. 

शिवसेनेला फरक पडत नाही"कुणी कितीही भोंगे वाजवले तरी शिवसेनेला फरक पडत नाही. मशिदीवरील भोंग्यांच्या राजकारणामुळे आज हिंदुनाच त्रास होत आहे. लाखो हिंदुंनी नाराजी व्यक्त केली आहे. कारण अनेक हिंदु मंदिरांमध्ये काकड आरती होऊ शकलेली नाही. त्यामुळे राज ठाकरेंनी सुरू केलंलं मशिदीवरील भोंग्यांचं राजकारण आज हिंदुंच्याच गळ्याशी आलं आहे", असंही संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाराज ठाकरेमनसे