तुमचे म्हसोबा बदलले, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 08:02 IST2022-04-14T08:02:12+5:302022-04-14T08:02:30+5:30

दिवा विझताना जास्त फडफडतो. तुमची अक्कल दीड वर्ष ईडी कार्यालयात गहाण पडली होती. आता तुमचे म्हसोबा बदलले.

shiv sena mp sanjay raut attacks on mns chief raj thackeray | तुमचे म्हसोबा बदलले, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला!

तुमचे म्हसोबा बदलले, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला!

मुंबई :  

दिवा विझताना जास्त फडफडतो. तुमची अक्कल दीड वर्ष ईडी कार्यालयात गहाण पडली होती. आता तुमचे म्हसोबा बदलले. अभय मिळाल्याने तुमचा भोंगा वाजतोय, अशा शब्दांत शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाण्यातील भाषणावर टीका केली.

तुम्ही शेंदूर लावून घेतला, मात्र आमचा बाणा तोच आहे. तसेच अल्टिमेटम् देण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती. त्यांनी दहशतवाद्यांना अल्टिमेटम् दिले. यांचे कसले आलेत अल्टिमेटम्, असा सवाल करतानाच, वैफल्यातून हे सारे सुरू असल्याचेही राऊत म्हणाले. तुम्ही एका द्वेषातून बोलताय. तुमच्या तोंडाला कोणी तरी भोंगा लावला आहे. आम्ही महाविकास आघाडीत आहोत आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. त्यांचा बाणा प्रखर हिंदुत्ववादाचा असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

Web Title: shiv sena mp sanjay raut attacks on mns chief raj thackeray