Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नेते संजय राऊत यांची ईडी चौकशी आता शुक्रवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 11:25 IST

गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्विकासामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याच्या प्रकरणात ईडीला राऊत यांची चौकशी करायची आहे. त्या अनुषंगाने ईडीने सोमवारी संध्याकाळी राऊत यांना समन्स जारी करत मंगळवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्यास सांगितले होते.

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांना मंगळवारी ईडी कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, राऊत चौकशीला अनुपस्थित राहिले आणि त्यांच्या वतीने त्यांच्या वकिलाने ईडीकडे मुदतवाढीचा अर्ज केला. राऊत यांचा मुदतवाढीचा अर्ज ईडीने फेटाळला असून, त्यांना १ जुलैला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे दुसरे समन्स जारी केले आहे. गोरेगाव येथील पत्राचाळीच्या पुनर्विकासामध्ये मनी लाँड्रिंग झाल्याच्या प्रकरणात ईडीला राऊत यांची चौकशी करायची आहे. त्या अनुषंगाने ईडीने सोमवारी संध्याकाळी राऊत यांना समन्स जारी करत मंगळवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्यास सांगितले होते. मंगळवारी चौकशीसाठी जाणार नसल्याचे राऊत यांनी सोमवारीच स्पष्ट केले होते. मात्र, मंगळवारी सकाळी राऊत यांच्यावतीने त्यांच्या वकिलाने ईडी कार्यालय गाठले आणि ईडीला ज्या मुद्द्यांची चौकशी करायची आहे त्याची कागदपत्रे गोळा करण्यासाठी वेळ लागेल, त्यासाठी १४ दिवसांची मुदत द्यावी, असा अर्ज सादर केला. मात्र, ईडीने राऊत यांचा अर्ज फेटाळला.  

टॅग्स :संजय राऊतअंमलबजावणी संचालनालयशिवसेना