Join us  

'... तो फिर सुन ले हुकूमत, हम तुझे नामर्द कहते हैं'; संजय राऊतांचा मोदींवर निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 3:45 PM

मुन्नवर राणा हे नेहमी देश आणि समाजातील विविध मुद्द्यावर साहित्याच्या माध्यमातून आवाज उचलतात

मुंबई - जेएनयू हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधण्यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच एकेकाळचा भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोदी सरकारवर परखड टीका केली आहे. 

प्रसिद्ध उर्दू कवी मुन्नवर राणा यांच्या ट्विटला राऊत यांनी रिट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मुन्नवर राणा यांनी सध्या देशात असणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करत मोदींवर घणाघात केला आहे. 'अगर दंगाइयों पर तेरा कोई बस नहीं चलता, तो फिर सुन ले हुकूमत, हम तुझे नामर्द कहते हैं' या शायराना अंदाजमध्ये मुन्नवर राणा यांनी समाचार घेतला आहे. 

मुन्नवर राणा हे नेहमी देश आणि समाजातील विविध मुद्द्यावर साहित्याच्या माध्यमातून आवाज उचलतात. एकेवेळी राणा यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत मोदी १०० वर्ष राज्य केलं तरी मुस्लिमांना अडचण नाही. मागील ६० वर्षात ज्यांनी राज्य केलं ते मुस्लिम थोडी होते. तर त्यानंतर देशात सरकारने दिलेला पुरस्कार परत करण्याचं सुरु होतं त्यावेळी राणा यांनीही केंद्र सरकारला त्यांचा पुरस्कार परत केला होता. देशातील परिस्थिती नाजूक असल्याने त्यांनी हा पुरस्कार परत केला होता. यानंतर राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटही घेतली होती. 

मुन्नवर राणा यांच्या शायरीचा आधार घेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधला. सध्या देशात जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर चहूबाजूने टीका होत आहे. विरोधकांसोबतच साहित्य वर्तुळातून अन् बॉलिवूडमधूनही केंद्र सरकारवर प्रहार केला जात आहे. राज्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुखवटे घालून यायचे अन् हल्ले करायचे हे भेकडपणाचे लक्षण आहे. हल्लेखोरांमध्ये हिंमत होती तर त्यांनी मुखवट्यांशिवाय यायचे होते. राज्यात विद्यार्थी सुरक्षित आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. कुणी प्रयत्न केला तर त्याचे काय करायचे ते करु अशा शब्दात इशारा दिला आहे. 

टॅग्स :संजय राऊतनरेंद्र मोदीजेएनयूउद्धव ठाकरे