Join us  

'भाजपाने ज्यांना बकरा केला, त्यांनी अकराच्या गोष्टी करु नये'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 5:29 PM

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतेमंडळी केवळ सत्तेसाठी आणि पदासाठी एकत्र आलेली आहे. पदासाठी पैसा आणि पैशासाठी पद हे समीकरण आताचे सत्ताधारी तयार करत आहेत असा टोला नारायण राणे यांनी लगावला होता.

ठळक मुद्दे येत्या ११ दिवसांत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे विधान भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केले होते. नारायण राणे भविष्यकार आहेत का असा सवाल उपस्थित करत गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे.

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कुठल्याही क्षणी कोसळू शकते. फार नाही तर येत्या ११ दिवसांत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार असल्याचे विधान भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी केले होते. नारायण राणेंच्या या विधानावर मंत्री आणि शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

नारायण राणे भविष्यकार आहेत का असा सवाल उपस्थित करत गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंवर टीका केली आहे. तसचे स्वत:चं भविष्य ते बनवू शकले नाहीत आणि दुसऱ्याचं काय सांगणार असं गुलाबराव पाटील यांनी  बीबीसी मराठीशी बातचीत करतना सांगितले. त्याचप्रमाणे महाविकास आघाडीचं काम जोरात सुरू असून ज्यांना भाजपना बकरा केला, त्यांनी अकराच्या गोष्टी करु नये असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंच्या खरपूस समाचार घेतला आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतेमंडळी केवळ सत्तेसाठी आणि पदासाठी एकत्र आलेली आहे. पदासाठी पैसा आणि पैशासाठी पद हे समीकरण आताचे सत्ताधारी तयार करत आहेत असा टोला नारायण राणे यांनी लगावला होता. तसेच भविष्यात उद्धव ठाकरेभाजपासोबत आल्यास त्याला विरोध करणार का? असा सवाल देखील नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्रिपदावरून भाजपासोबत वाद झाल्यानंतर शिवसेना महायुतीमधून बाहेर पडली होती. तसेच शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी करून सरकार स्थापन केले होते. मात्र हे सरकार सत्तेवर आल्यापासून भाजपाकडून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सातत्याने टीका केली जात आहे. तसेच हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावाही भाजपाच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. 

टॅग्स :नारायण राणे शिवसेनाभाजपामहाराष्ट्र विकास आघाडीउद्धव ठाकरेमहाराष्ट्र सरकार