Join us  

भाजपा नगरसेविकांनी केलेल्या धक्काबुक्की, विनयभंगाची शिवसेनेने केली लेखी तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2021 4:46 PM

Crime News : भाजपा नगरसेविकांनी केलेल्या धक्काबुक्कीची व विनयभंगाची लेखी तक्रार देण्यात आली, अशी माहिती शिवसेना प्रवक्त्या- नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी दिली.

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या सभागृहाबाहेर ३ डिसेंबर रोजी गुंड पाठवून विनयभंग केल्याचा बिनबुडाचा आरोप आणि खोटी तक्रार भाजपा नगरसेविकांकडून राज्य महिला आयोगाकडे करण्यात आली होती.

खरे पाहता या प्रसंगी भाजपा नगरसेवकांनींच असंवैधानिक कृत्य करत शिवसेना नगरसेविकांना धक्काबुक्की केली होती.आज या संपूर्ण घटनेची वस्तुस्थिती हि राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव मेघना पाटील यांची शिवसेनेच्या पालिकेतील शिष्टमंडळाने त्यांच्या वांद्रे पूर्व,म्हाडा,गृहनिर्माण भवन येथील कार्यालयात भेट घेऊन सांगितली आणि या आरोपांचे खंडन करणारे पत्र देखील त्यांना सादर केले. यावेळी भाजपा नगरसेविकांनी केलेल्या धक्काबुक्कीची व विनयभंगाची लेखी तक्रार देण्यात आली, अशी माहिती शिवसेना प्रवक्त्या- नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी दिली.

यावेळी पालिकेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत,शिवसेना प्रवक्त्या- नगरसेविका शीतल म्हात्रे, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल आणि नगरसेविका अरुंधती दूधवडकर उपस्थित होत्या.

टॅग्स :गुन्हेगारीपोलिसमहाराष्ट्र राज्य महिला आयोगभाजपाशिवसेना