भाजपाने पळत्यांच्या मागे लागू नये; लोकसभा उपाध्यक्षपदावरुन शिवसेनेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 09:35 AM2019-06-21T09:35:19+5:302019-06-21T09:35:47+5:30

अटी-शर्ती पूर्ण झाल्या तरच लोकसभेचे उपाध्यक्षपद स्वीकारू असे कळविण्यात आले. जगन यांच्या इतके मागे लागण्याची गरज आहे काय?

Shiv Sena Criticized BJP on post of Lok Sabha dy. Speaker | भाजपाने पळत्यांच्या मागे लागू नये; लोकसभा उपाध्यक्षपदावरुन शिवसेनेचा टोला

भाजपाने पळत्यांच्या मागे लागू नये; लोकसभा उपाध्यक्षपदावरुन शिवसेनेचा टोला

Next

मुंबई - भारतीय जनता पक्षानेही आता पळत्यांच्या मागे फार लागू नये. संसदेत बहुमत आहे, पाठीशी शिवसेना आहे. मग इतरांची मनधरणी का करायची? असा सवाल शिवसेनेकडून भाजपाला विचारण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून लोकसभा उपाध्यक्षपदावरुन चर्चा रंगत आहे. लोकसभा उपाध्यक्षपद कोणाला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेस पक्षाला लोकसभा उपाध्यक्षपद देणार अशी चर्चा आहे. यावर शिवसेनेने म्हटलं की, जगनमोहन रेड्डीला लोकसभा उपाध्यक्षपदाची ‘ऑफर’ देण्यात आली, पण जगन यांनी भाजपला काही अटी घातल्या. अटी-शर्ती पूर्ण झाल्या तरच लोकसभेचे उपाध्यक्षपद स्वीकारू असे कळविण्यात आले. जगन यांच्या इतके मागे लागण्याची गरज आहे काय? असा सवाल शिवसेनेने भाजपाला केला आहे. तसेच एखादे ओम बिर्ला एन.डी.ए.मधूनही उपाध्यक्षपदासाठी शोधायला हवेत असे सांगत लोकसभा उपाध्यक्षपदासाठी सुप्त इच्छा बोलून दाखविली आहे. 

17व्या लोकसभेचे अध्यक्ष म्हणून राजस्थानमधील भाजपा खासदार ओम बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदासाठी YSR, शिवसेना की BJD या पक्षांच्या नेत्यांची चर्चा आहे. लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर एनडीएचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनं दावा केला आहे. परंतु मोदी सरकार एनडीएच्या बाहेरच्या पक्षाला हे पद देऊ इच्छिते. शिवसेनेचे 18 खासदार असूनही त्यांच्या वाट्याला फक्त एकच कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. एनडीएमध्ये भाजपानंतर सर्वाधिक खासदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर शिवसेनेनं दावा केला आहे. ती आमची मागणी नाही, तर तो आमचा नैसर्गिक अधिकार आहे. लोकसभेचे उपाध्यक्षपद हे आम्हालाच मिळालं पाहिजे, असंही संजय राऊतांनी सांगितलं होतं.


जर लोकसभा उपाध्यक्षपद शिवसेनेच्या वाट्याला आले तर भावना गवळींना हे पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भावना गवळी या शिवसेनेच्या अनुभवी खासदार आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून सलग तीनदा त्यांनी खासदार होण्याचा मान मिळवला आहे, लोकसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या भावना गवळी यांना यंदा मंत्रिपद मिळण्याचा अंदाज बांधला जात होता मात्र त्यांच्याऐवजी अरविंद सावंत यांना संधी देण्यात आली. 

Web Title: Shiv Sena Criticized BJP on post of Lok Sabha dy. Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.