मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर कलेल्या शिवभोजन थाळीला राज्यभरात सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील गणेशपेठ बसस्थानक परिसरात या थाळीचा शुभारंभ करण्यात आला. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते फित कापून याचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी राज्यभरात 11,417 जणांनी या थाळीचा लाभ घेतला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी या शिवभोजन योजनेवरुन सरकारवर टीका केलीय.
राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्याची ही योजना आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राज्यात काल शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. राज्यात पहिल्याच दिवशी 11 हजार 417 नागरिकांनी या भोजनाचा लाभ घेतल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली. भुजबळ यांनी नाशिक येथून शिवभोजन योजनेचा शुभारंभ केला होता.