१०० जागांची तयारी शिंदे सेनेकडून सुरू; पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:36 IST2024-12-31T15:36:22+5:302024-12-31T15:36:51+5:30

महापालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होईल, अशी परिस्थिती असली तरी अद्याप मुंबईच्या पालकमंत्रिपदाची घोषणा बाकी आहे. आम्ही त्याची वाट पाहत आहोत. त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रभाग स्तरावर काम करता येईल.

Shinde Sena starts preparations for 100 seats; Will hoist the flag of the Mahayuti on the municipality | १०० जागांची तयारी शिंदे सेनेकडून सुरू; पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणार

१०० जागांची तयारी शिंदे सेनेकडून सुरू; पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणार

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीची घोषणा अद्याप झाली नसली तरी मार्चमध्ये निवडणूक होणे अपेक्षित आहे. त्यानुसार महायुतीतील सर्व घटक पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून शिंदेसेनेने १०० जागांवर लढण्याचे लक्ष्य ठेवले आहे, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी दिली. 

महापालिका निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होईल, अशी परिस्थिती असली तरी अद्याप मुंबईच्या पालकमंत्रिपदाची घोषणा बाकी आहे. आम्ही त्याची वाट पाहत आहोत. त्यानंतरच खऱ्या अर्थाने प्रभाग स्तरावर काम करता येईल. सध्या ८५ माजी नगरसेवक आमच्या पक्षासोबत आहेत. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात ताकद निर्माण झाली आहे. त्यानुसार प्रभाग स्तरावर आम्ही बैठका आणि बांधणी मजबूत करू, असे सावंत म्हणाले.

महायुती म्हणून लढू, स्वबळाचीही तयारी!
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या पातळीवर लढवल्या जातात. या निवडणुकाही आम्ही महायुती म्हणून लढण्याचा प्रयत्न करू. 
- किमान १०० जागा लढवण्याचा आमचा प्रयत्न आहेच. मात्र, जर घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी लढवण्याची इच्छा व्यक्त केली आणि जर काही कारणाने स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला तर आम्ही त्यासाठीही तयार आहोत, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.
खात्यांचा उपयोग 
आमच्या पक्षाकडे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण ही तीन महत्त्वाची खाती आहेत. त्यांचा वापर भविष्यात मुंबई शहरातील अनेक विभागांमध्ये करता येऊ शकतो, असेही ते म्हणाले.
 

Web Title: Shinde Sena starts preparations for 100 seats; Will hoist the flag of the Mahayuti on the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.