मुंबई : शिंदेसेनेच्या राज्य विभागीय व लोकसभा मतदारसंघनिहाय संपर्क प्रमुखांच्या नियुक्त्यांची घोषणा आज झाली. यानुसार मुंबई-ठाण्याची सगळी सूत्रे खा. श्रीकांत शिंदे यांच्याकडे असतील तर मुंबईतील जुने शिवसैनिक, माजी आ. दगडू सकपाळ यांच्यासह माजी नगरसेवकापासून नेते आणि मंत्र्यांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. मात्र, माजी मंत्री, आ. दीपक केसरकर यांना यातून बाहेर ठेवल्याने खरात प्रकरणाबाबतचे आरोप केसरकरांना भोवल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार उत्तर कोकण विभागीय संपर्क प्रमुखपदी मंत्री भरत गोगावले तर मराठवाडाची जबाबदारी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यावर सोपविण्यात आली असून, पश्चिम महाराष्ट्रासाठी माजी आ. दगडू सकपाळ आणि दक्षिण कोकण विभागासाठी मंत्री उदय सामंत यांचे बंधू आ. किरण सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संपर्क प्रमुखांच्या यादीत माजी नगरसेवकही
विशेष म्हणजे या संपर्क प्रमुखांच्या यादीत मुंबईतील माजी नगरसेवकांवरही जबाबदारी सोपविण्यात आली असून, माजी आमदार, माजी खासदार, माजी मंत्री यांनाही स्थान देण्यात आले आहे. मात्र, माजी मंत्री आणि पक्षाचे प्रवक्तेपद सांभाळलेले दीपक केसरकर यांना यामधून बाजूला ठेवण्यात आल्याचे दिसत आहे.
भिवंडी, कल्याण म्हस्केंकडे
मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघ तसेच ठाण्याची जबाबदारी खा. श्रीकांत शिंदे यांच्यावर असेल तर भिवंडी व कल्याण लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदी खा. नरेश म्हस्के यांची निवड करण्यात आली आहे. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांकरिता विभागीय संपर्क प्रमुख म्हणून माजी मंत्री दीपक सावंत, पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी आ. मनीषा कायंदे, पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्यांसाठी मंत्री संजय राठोड यांची विभागीय संपर्कप्रमुख निवड करण्यात आल्याचे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
Web Summary : Shinde Sena appointed constituency heads, sidelining Deepak Kesarkar amid controversy. Shrikant Shinde oversees Mumbai-Thane. Bharat Gogawale leads North Konkan, Prakash Abitkar Marathwada, Dagdu Sakpal West Maharashtra, and Kiran Samant South Konkan. Former corporators also get roles.
Web Summary : शिंदे सेना ने निर्वाचन क्षेत्र प्रमुखों की नियुक्ति की, दीपक केसरकर को विवाद के बीच अलग रखा। श्रीकांत शिंदे मुंबई-ठाणे की देखरेख करते हैं। भरत गोगावले उत्तरी कोंकण, प्रकाश अबिटकर मराठवाड़ा, दगडू सकपाल पश्चिमी महाराष्ट्र और किरण सामंत दक्षिणी कोंकण का नेतृत्व करते हैं। पूर्व पार्षदों को भी भूमिकाएँ मिलीं।