प्रचंड प्रतिसाद बघून तुमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या...; नरेश म्हस्केंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2023 11:15 IST2023-06-22T11:03:11+5:302023-06-22T11:15:03+5:30

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

Shinde group spokesperson Naresh Mhaske has criticized NCP MP Supriya Sule. | प्रचंड प्रतिसाद बघून तुमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या...; नरेश म्हस्केंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

प्रचंड प्रतिसाद बघून तुमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या...; नरेश म्हस्केंचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

मुंबई: शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात शासन आपल्या दारी कार्यकर्माचे आयोजन करण्यात आले होते. त्याची पोस्टही त्यांनी आपल्या अधिकृत पेजवरून केली. यावरुन नरेश म्हस्के यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

कालपर्यंत हे लोक शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका करत होते. मात्र, आज तेच लोक कार्यक्रम घेत आहेत. ही सरळ-सरळ कॉपी आहे. मुख्यमंत्र्यांचा झपाटा बघून उपक्रमाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद बघून तुमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत. म्हणूनच तुम्ही कॉपी करताय. हे म्हणजे दुसऱ्याच्या तव्यावर आपली पोळी भाजायचा प्रकार असल्याची टीका नरेश म्हस्के यांनी केली आहे. 

दरम्यान, आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील वारजे येथील रामचंद्र पॅलेसमध्ये 'शासन आपल्या दारी' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय पुणे व हवेली तहसीलदार कार्यालय अंतर्गत राबवलेल्या या उपक्रमात विविध योजना व शासकीय दाखले एकाच ठिकाणी मिळणार असल्याची माहिती सुप्रिया सुळेंनी या पोस्टद्वारे दिली होती. 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

भाजपा (29005 votes)
शिवसेना (3598 votes)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) (28422 votes)
काँग्रेस (7048 votes)
राष्ट्रवादी काँग्रेस (9798 votes)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (11906 votes)
वंचित बहुजन आघाडी (11579 votes)
आम आदमी पार्टी (3454 votes)
भारत राष्ट्र समिती (2029 votes)
अन्य (1492 votes)

Total Votes: 108331

VOTEBack to voteView Results

Web Title: Shinde group spokesperson Naresh Mhaske has criticized NCP MP Supriya Sule.