Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना एकनाथ शिंदेंना सलाईन द्यावी लागते, मग ते उद्यासाठी तयार होतात- दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 14:13 IST

शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे.

मुंबई- विरोधी पक्षनेते अजित पवार सकाळी सहा वाजेपासून काम करतात, असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं. त्यावर आधी अजित दादा टीका करत होते. आता सुप्रियाताई सुद्धा टीका करत आहेत. त्यांना माझे सांगणे आहे की, ताई मी सकाळी सहावाजेपर्यंत काम करतो, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं. 

एकनाथ शिंदेंच्या या विधानावर आता अजित पवारांनी सवाल उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदे सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात, मग झोपतात कधी?, असं सवाल अजित पवारांनी विचारला होता. यावर आता शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिलं आहे. एकनाथ शिंदे रोज सकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत काम करतात. शेवटी डॉक्टरांना त्यांना सलाईन द्यावी लागते, तर ते उद्यासाठी तयार होतात. मात्र याबाबत एकनाथ शिंदे कधीही प्रदर्शन करत नाही. लोकांच्या कामसाठी ते खूप वेळ देतात, असा मुख्यमंत्री कधी राज्यानं पाहिला नसेल, असं कौतुक दीपक केसरकर यांनी केलं आहे. 

 'खोके सरकार म्हणणाऱ्यांची कुंडली माझ्याकडे'; एकनाथ शिंदेंचा थेट दिल्लीतून इशारा

तत्पूर्वी, सहा वाजता उठून दादा काम करतात, ही चांगली गोष्ट आहे, पण मी ताईना माहिती देतो की, हा एकनाथ शिंदे सकाळी सहा वाजेपर्यंत लोकांच काम करतो, आणि हे काम मी महाराष्ट्रासाठी करत राहाणार त्यामध्ये कोणताही खंड पडू देणार नाही, अशा शब्दात त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर दिले होते. त्यानंतर आता अजित पवारांनी शिंदेंवर पहाटेपर्यंत काम करण्यावरून हल्लाबोल केला आहे. तसेच टीका करणं त्यांचं काम आहे, विकासाचं काम करत राहणे हे आमचं काम आहे, आम्ही कामातून उत्तर देऊ, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते.

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आजाराविषयी भाष्य केलं होतं. मी आजारी असताना माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत आणि तेव्हा पसरवलं जात होतं की, हे आता काही उभे राहात नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

BMC नं परवानगी नाकारली; आता दसरा मेळाव्यावरून शिंदे-ठाकरे गटात हायकोर्टात लढाई

आता आपले काय होणार?…तुझं काय होणार? ही चिंता त्यांना होती. ज्या काळात आपल्याला पक्षाला सावरण्याची वेळ होती. मी पक्षप्रमुख, कुटुंबप्रमुख आहे, पण शस्त्रक्रिया झाल्यानंतर माझी हालचाल होत नव्हती, त्या काळात यांच्या हालचाली जोरात सुरू होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत राहणार आहे,' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपलं दु:ख बोलून दाखवलं होतं.

टॅग्स :एकनाथ शिंदेदीपक केसरकर महाराष्ट्र सरकार