पोलिसांसमोरच होणार शेखर कपूर यांचा जबाब

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2020 07:02 AM2020-07-11T07:02:13+5:302020-07-11T07:02:29+5:30

कपूर हे सध्या मुंबईबाहेर म्हणजे उत्तराखंडमध्ये आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर यासंदर्भात केलेल्या टिष्ट्वटमुळे त्यांना जबाब नोंदविण्यासाठी वांद्रे पोलिसांनी बोलावले होते.

Shekhar Kapoor's answer will be in front of the police | पोलिसांसमोरच होणार शेखर कपूर यांचा जबाब

पोलिसांसमोरच होणार शेखर कपूर यांचा जबाब

Next

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनी ई-मेलद्वारे त्यांचा जबाब मुंबई पोलिसांना पाठवला आहे. मात्र या ई-मेलला अधिकृत जबाब म्हणून पोलिसांनी स्वीकारलेले नाही. त्यामुळे त्यांना पोलिसांसमोर येऊनच जबाब दाखल करावा लागणार असल्याचे अधिकृत सूत्रांचे म्हणणे आहे.
कपूर हे सध्या मुंबईबाहेर म्हणजे उत्तराखंडमध्ये आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर यासंदर्भात केलेल्या टिष्ट्वटमुळे त्यांना जबाब नोंदविण्यासाठी वांद्रे पोलिसांनी बोलावले होते. मात्र ते स्वत: हजर राहू न शकल्याने त्यांनी मुंबई पोलिसांना ई-मेल पाठवत ‘पानी’ चित्रपट आणि सुशांतच्या मानसिक स्थितीबाबत बरीच माहिती दिल्याचे समजते. मात्र या ई-मेलला पोलिसांनी अधिकृतरीत्या स्वीकारलेले नाही, अशी माहिती आहे.
दरम्यान, सुशांतला ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांत मुख्य भूमिका देण्याची इच्छा होती. मात्र त्या वेळी तो यशराज फिल्मस्सोबत ‘पानी’वर काम करत होता. त्यामुळे आपल्याला भन्साळींच्या चित्रपटात लक्ष केंद्रित करता येणार नाही याची कल्पना असल्याने सुशांतनेच त्यांना नकार दिल्याचे निर्माते संजय लीला भन्साळी यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या जबाबात पोलिसांना सांगितल्याचे समजते. तर, यशराजने काही वादामुळे वर्षभरानंतर ‘पानी’ या चित्रपटाचे कामच थांबविले. त्यामुळे सुशांत तणावात गेल्याचे कपूर यांचे म्हणणे आहे.
प्रत्यक्षात कपूर यांनी ई-मेलमध्ये कोणाचेही नाव लिहिलेले नाही, मात्र टिष्ट्वटमध्ये ‘मला माहीत आहे ते लोक कोण आहेत ज्यांनी तुझ्यावर ही परिस्थिती आणली’ अशा आशयाचा मजकूर त्यांनी लिहिला आहे. त्यामुळे कपूर यांना जबाब नोंदवताना तपास अधिकाऱ्यांच्या बºयाच प्रश्नांची उत्तरेही द्यावी लागतील, असे सूत्रांकडून समजते.

पोलिसांनी नोंदवले ३० हून अधिक जबाब

सुशांतसिंह राजपूत १४ जून रोजी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याच्या बेडरूममध्ये आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३० हून अधिक लोकांचे जबाब नोंदविले असून अद्यापही तपास सुरू आहे.

Web Title: Shekhar Kapoor's answer will be in front of the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.