Join us  

शरद पवारांना भावला पाकिस्तानचा पाहुणचार; म्हणाले, खोटं बोलतंय मोदी सरकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 1:45 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाकिस्तानचा पाहुणचार भावला असून त्यांनी पाकिस्तानमधील लोकांची प्रशंसा केली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाकिस्तानचा पाहुणचार भावला असून त्यांनी पाकिस्तानमधील लोकांची प्रशंसा केली आहे. पाकिस्तानात माझे चांगले स्वागत झाले. भारतातून आलेल्या व्यक्तींना ते आपले नातेवाईक समजतात असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. सत्ताधारी वर्ग राजकीय फायद्यासाठी खोट्या गोष्टी पसरवत असल्याची टीका पवार यांनी केली.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पाकिस्तानचा पाहुणचार भावला असून त्यांनी पाकिस्तानमधील लोकांची प्रशंसा केली आहे. पाकिस्तानात माझे चांगले स्वागत झाले. भारतातून आलेल्या व्यक्तींना ते आपले नातेवाईक समजतात असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानमध्ये लोकांवर अन्याय होतो असं भारतातील काही लोक म्हणतात हे खोटं आहे. केवळ राजकीय फायद्यासाठी अशी वक्तव्ये केली जातात असं म्हणत पवारांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच सत्ताधारी वर्ग राजकीय फायद्यासाठी खोट्या गोष्टी पसरवत असल्याची टीका देखील शरद पवार यांनी केली आहे.

'मी पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर माझे चांगले स्वागत झाले. पाकिस्तानमधील नागरिक त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी भारतात येऊ शकत नसतील पण भारतातून आलेल्या व्यक्तींना ते आपले नातेवाईक समजतात' असं पवारांनी म्हटलं आहे. तसेच पाकिस्तानी लोकांवर अन्याय होतो असं भारतात लोक म्हणतात. पाकिस्तानमधील लोक खूश नाहीत असंही सांगितलं जातं. मात्र हे सर्व खोटं आहे. तेथील परिस्थिती न पाहता अशा प्रकारे करण्यात येणारी वक्तव्ये ही केवळ राजकीय फायद्यासाठीच केली जातात असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. 

सत्ताधारी वर्ग राजकीय फायद्यासाठी खोट्या गोष्टी पसरवत असल्याची टीका देखील पवार यांनी केली. मुंबईत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी शरद पवार यांनी असं म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली होती. या भेटीत महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यानंतर मुंबई काँग्रेस अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी मुंबईतील जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती दिली. विशेष म्हणजे मुंबईसाठी राष्ट्रवादीने केवळ 5 जागांवर तयारी दर्शवली आहे. तर, काँग्रेस 25 जागांवर लढवणार आहे. एकनाथ गायकवाड यांना ऊर्मिला मातोंडकर यांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता, ऊर्मिला मातोंडकर यांच्याशी मी स्वत: चर्चा करणार आहे. त्यांची समजूत काढण्यात येईल, असेही एकनाथ गायकवाड यांनी म्हटले होते.  

 

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसभाजपाभारतपाकिस्तान