BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 18:09 IST2025-12-29T18:08:46+5:302025-12-29T18:09:37+5:30
NCP Sharad Pawar Candidates First List: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले आहे असून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत सात प्रमुख वॉर्डांमधील उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाने अतिशय विचारपूर्वक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी अध्यक्ष मिलिंद कांबळे आणि सहअध्यक्ष सोहेल सुभेदार यांच्या अधिकृत मान्यतेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी:
| अ. क्र. | वॉर्ड क्रमांक | उमेदवाराचे नाव | आरक्षण |
| १ | ४३ | अजित रावराणे | सर्वसाधारण |
| २ | १४० | संजय भीमराव कांबळे | एस.सी |
| ३ | ७८ | रदबा जावेद देऊळकर | सर्वसाधारण महिला |
| ४ | ४८ | अॅड. गणेश शिंदे | सर्वसाधारण |
| ५ | १७० | रूही मदन खानोलकर | ओबीसी महिला |
| ६ | ५१ | आरती सचिन चव्हाण | सर्वसाधारण महिला |
| ७ | ११२ | मंजू रविंद्र जायस्वाल | सर्वसाधारण महिला |
जाहीर केलेल्या ७ उमेदवारांपैकी ४ जागांवर महिला उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. सर्वसाधारण गटासोबतच अनुसूचित जाती आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांनाही स्थान देण्यात आले. या यादीमुळे आता मुंबई महापालिकेच्या मैदानात शरद पवार गटाने आपले मोहरे उतरवण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.