Sexual abuse on 'paying guest' locked in room! | खोलीत कोंडून ‘पेईंग गेस्ट’वर लैंगिक अत्याचार!

खोलीत कोंडून ‘पेईंग गेस्ट’वर लैंगिक अत्याचार!

मुंबई : पेर्इंग गेस्टवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी अंधेरीत उघडकीस आला. या प्रकरणी घराचा मालक, त्याची पत्नी आणि तिच्या भावाविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चोवीस वर्षांची हिना (नावात बदल) ही मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी हैदराबादमधून मुंबईत आली होती. ती या ठिकाणी फ्लॅट भाडेतत्त्वावर घेऊन राहत होती. यादरम्यान तिची ओळख इस्टेट एजंट निरज वर्मा याच्यामार्फत सोनिया गील या महिलेशी झाली. तेव्हा अंधेरीतील तिच्या घरात भाडेतत्त्वावर राहण्याचे तिने हिनाला सुचविले. तसेच त्याबदल्यात निव्वळ १० हजार रुपये भाडे स्वरूपात देण्याचेही कबूल केले. मात्र गीलसोबत तिचा भाऊ राकेश उपाध्याय आणि प्रियकर समरदेखील राहत असल्याने हिनाला त्या ठिकाणी राहणे धोक्याचे वाटत होते. मात्र मी आणि माझा मित्र एका बेडरूममध्ये तर राकेश हॉलमध्ये राहील, म्हणजे अजून एक बेडरूम तुला वापरता येईल, असे गीलने हिनाला सांगितले. त्यानुसार ३ लाख डिपॉझिट आणि १० हजार रुपये महिना भाडे या तत्त्वावर गीलने करार केला. मात्र त्याचे रजिस्ट्रेशन केले नाही. त्यानंतर १० डिसेंबर, २०१९ रोजी गील हिने तिचा भाऊ आणि मित्रासोबत घरात पार्टी केली. त्यात वाईनचा एक ग्लास हिनालादेखील दिला. तो प्यायल्यावर तिला चक्कर आली. सकाळी उठल्यावर ती तिच्या बेडरूममध्ये होती. तसेच तिच्या शेजारी उपाध्याय विवस्त्र अवस्थेत झोपला होता. या प्रकरणी हिनाने विरोध केला तेव्हा उपाध्याय याने तिच्याशी लग्न करण्याचे आमिष तिला दाखवले. तसेच गीलदेखील तिला वहिनी म्हणून बोलावू लागली. हिनाला बेडरूममध्ये बंद करून तिच्यावर उपाध्याय रोज लैंगिक अत्याचार करीत होता.

Web Title: Sexual abuse on 'paying guest' locked in room!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.