सात ‘आयएएस’ची बदली, डॉ. निधी पांडे लघुउद्योग महामंडळाच्या एमडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 05:16 IST2025-04-03T05:16:18+5:302025-04-03T05:16:40+5:30
Transfer News: राज्य सरकारने सात आयएएस अधिकाऱ्यांची मंगळवारी रात्री बदली केली. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या डॉ. निधी पांडे या महाराष्ट्र राज्य लघुउद्योग महामंडळाच्या नवीन व्यवस्थापकीय संचालक असतील.

सात ‘आयएएस’ची बदली, डॉ. निधी पांडे लघुउद्योग महामंडळाच्या एमडी
मुंबई - राज्य सरकारने सात आयएएस अधिकाऱ्यांची मंगळवारी रात्री बदली केली. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या डॉ. निधी पांडे या महाराष्ट्र राज्य लघुउद्योग महामंडळाच्या नवीन व्यवस्थापकीय संचालक असतील.
लक्ष्मीनारायण मिश्रा यांची बदली एमएसआरडीसीच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भारत बस्तेवाड हे मनरेगा, नागपूरचे नवीन आयुक्त असतील, तर नेहा भोसले या रायगड जिल्हा परिषदेच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील.