Ravi Rana & Navneet Rana: राणा दाम्पत्याला मोठा दिलासा, सत्र न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 11:39 IST2022-05-04T11:38:36+5:302022-05-04T11:39:17+5:30

Ravi Rana & Navneet Rana News: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिल्यानंतर अटकेची कारवाई झालेल्या आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या रवी राणा आणि नवनीत राणा या दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर झाला आहे.

Sessions court finally grants bail to Ravi Rana & Navneet Rana | Ravi Rana & Navneet Rana: राणा दाम्पत्याला मोठा दिलासा, सत्र न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर

Ravi Rana & Navneet Rana: राणा दाम्पत्याला मोठा दिलासा, सत्र न्यायालयाकडून अखेर जामीन मंजूर

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचे आव्हान दिल्यानंतर अटकेची कारवाई झालेल्या आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या रवी राणा आणि नवनीत राणा या दाम्पत्याला अखेर जामीन मंजूर झाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने आज राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणू, असा इशारा देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात गुन्हे दाखल करून त्यांची त्यांची रवानगी तुरुंगात झाली होती. कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यातच राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाच्या गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या होत्या. दरम्यान, जामिनासाठी प्रयत्नशील असलेल्या राणा दाम्पत्याच्या जामीर अर्जावर सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली होती. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाले होते. मात्र न्यायालयाने राणा दाम्पत्याच्या जामिनावरील निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या तुरुंगातील मुक्कामात वाढ झाली होती.

राणा दाम्पत्याच्या जामिनावर सत्र न्यायालयाकडून सोमवारी निकाल अपेक्षित होता.  मात्र अन्य प्रकरणात सुरू असलेल्या सुनावणी आणि त्यामुळे वेळेचा अभाव यामुळे राणांच्या जामिनावर न्यायालयानं सोमवारी निकाल दिला नव्हता. अखेर राणा दाम्पत्याच्या जामिनावर न्यायालयाने आज निकाल दिला. 

Web Title: Sessions court finally grants bail to Ravi Rana & Navneet Rana