IITच्या कँटिनमध्ये शाकाहारींसाठी स्वतंत्र टेबल, मेस काऊन्सिल

By स्नेहा मोरे | Published: September 29, 2023 07:54 PM2023-09-29T19:54:43+5:302023-09-29T19:55:02+5:30

पुन्हा वाद होण्याची शक्यता

Separate table for vegetarians in IIT canteen, mess council | IITच्या कँटिनमध्ये शाकाहारींसाठी स्वतंत्र टेबल, मेस काऊन्सिल

IITच्या कँटिनमध्ये शाकाहारींसाठी स्वतंत्र टेबल, मेस काऊन्सिल

googlenewsNext

मुंबई : काही महिन्यांपूर्वी आयआयटी मुंबईच्या कँटिनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी विद्यार्थ्यांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर आता आयआयटी प्रशासनाने शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी कँटिनमध्ये स्वतंत्र टेबल राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.

आयआयटीच्या वसतिगृह १२च्या कँटिनमध्ये जुलै महिन्यात मांसाहारीविरुद्ध शाकाहारी असा वाद निर्माण झाला होता. येथे फक्त शाकाहारी विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी आहे, अशा आशयाची भित्तीपत्रके कँटिनमध्ये लावण्यात आली होती. या भित्तीपत्रकाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.

आता मेस काऊन्सिलने वसतिगृह १२, १३ आणि १४च्या विद्यार्थ्यांना मेल पाठविला असून या तीनही वसतिगृहांच्या कँटिनमध्ये सहा टेबल फक्त शाकाहारींसाठी असून या नियमाचे उल्लंघन झाल्यास योग्य ती कारवाई करून दंड आकारला जाईल, असे त्यात सूचित केले आहे. आयआयटीच्या कॉमन कँटिनमध्ये ८० ते १०० टेबल असून त्यापैकी सहा टेबल शाकाहारी व्यक्तींसाठी राखीव असतील. एका टेबलवर प्रत्येकी आठ जण बसू शकतात. शाकाहारींच्या टेबलवर विशेष खुणा असतील.

मेस काऊन्सिलचे स्पष्टीकरण

कँटिनमध्ये जेवताना मांसाहारी भोजन पाहून किंवा त्याचा वास काही जणांना सहन होत नाही. त्यामुळे संबंधितांना प्रकृतीच्या तक्रारी उद्भवतात. त्यामुळे कँटिनमध्ये शाकाहारी असणाऱ्यांसाठी सहा वेगळे टेबल्स असणे, ही गरजेची गोष्ट आहे, असे विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये मेस काऊन्सिलकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. वसतीगृहातील विद्यार्थ्यांना पाठवण्यात आलेल्या या ई-मेलमध्ये वॉर्डन, मेसचे सदस्य, मेस कौन्सिलर यांचा समावेश आहे.

 

Web Title: Separate table for vegetarians in IIT canteen, mess council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.