ठाण्याच्या आयुक्तपदासाठी सेवाजेष्ठता की अन्य निकष ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 02:47 AM2021-05-06T02:47:51+5:302021-05-06T02:48:12+5:30

परमबीर सिंग प्रकरणामुळे नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष

Seniority or other criteria for the post of Thane Commissioner? | ठाण्याच्या आयुक्तपदासाठी सेवाजेष्ठता की अन्य निकष ?

ठाण्याच्या आयुक्तपदासाठी सेवाजेष्ठता की अन्य निकष ?

Next
ठळक मुद्देठाण्याचे आयुक्त विवेक फणसाळकर यांची ‘पोलीस हौसिंग’मध्ये पदोन्नतीवर बढती झाल्याने त्याठिकाणचा तात्पुरता पदभार सहआयुक्त सुरेशकुमार  मेखला यांच्याकडे सोपविण्यात आला आहे

जमीर काझी

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त पदानंतर सर्वाधिक वलय असलेल्या ठाणे आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्व पोलीस वर्तुळात उत्सुकता लागून राहिली आहे. विशेषतः परमबीर सिंग ‘लेटर बॉम्ब’ प्रकरणानंतर महाविकास आघाडी सरकार नियुक्तीसाठी कोणता निकष निश्चित करते?, सेवाजेष्ठता की अन्य  काही, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

ठाण्याचे आयुक्त विवेक फणसाळकर यांची ‘पोलीस हौसिंग’मध्ये पदोन्नतीवर बढती झाल्याने त्याठिकाणचा तात्पुरता पदभार सहआयुक्त सुरेशकुमार 
मेखला यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, येत्या काही दिवसात त्याठिकाणी पूर्णवेळ आयुक्तांची नियुक्ती करावी लागणार आहे, त्यासाठी गृह विभाग व संबंधित अधिकारी वर्तुळात जोरदार हालचाली सुरू आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेथे एटीएसचे प्रमुख जयजीत सिंग यांचे नाव आघाडीवर आहे. ते १९९०च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत, त्याशिवाय सेवाजेष्ठतेनुसार १९८९च्या बॅचचे व सध्या राज्याची ‘कायदा व सुव्यवस्था’ सांभाळत असलेले अतिरिक्त महासंचालक राजेंद्र सिंह आणि ‘पोलीस हौसिंग’च्या प्रज्ञा सरवदे हे ज्येष्ठ आहेत. 

राजेंद्र सिंह हे सरळमार्गी  आणि कायद्यावर बोट ठेवून काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात, त्यामुळे आघाडीचे नेते त्यांना कितपत पसंती देतात,  हे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय जयजीत सिंग यांच्या बॅचचे मीरा-भाईंदरचे आयुक्त सदानंद दाते, नवी मुंबईचे आयुक्त बिपीन कुमार सिंह, एडीजी के. के. सरगल यांचीही नावे चर्चेत आहेत. यामध्ये जयजीत सिंग यांना संधी मिळण्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Seniority or other criteria for the post of Thane Commissioner?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app