Sudhir Joshi: सुधीर जोशी यांचं निधन; स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे विश्वासू म्हणून होती ओळख
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 17:30 IST2022-02-17T17:21:18+5:302022-02-17T17:30:54+5:30
शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये सुधीर जोशी यांचा मोठा वाटा होता.

Sudhir Joshi: सुधीर जोशी यांचं निधन; स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे विश्वासू म्हणून होती ओळख
मुंबई: शिवसेनेचे जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचं आज ( गुरुवारी) निधन झालं आहे. ते ८१ वर्षाचे होते. (Sudhir Joshi Death)शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये सुधीर जोशी यांचा मोठा वाटा होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय जवळचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख होती.
मागील काही दिवसांपासून सुधीर जोशी यांची प्रकृती खालवली होती. त्यांना कोरोनाचा संसर्गही होऊन गेला होता. सुधीर जोशी यांच्यावर मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. नुकतेच कोरोनाच्या आजारातून घरी परतले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावली होती.
सुधीर जोशी हे शिवसेनेचे मुंबईचे दुसरे महापौर होते. पहिल्या युतीच्या सरकारमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेटपदही भूषावले आहे. त्यांनी महसूलमंत्री म्हणून काम काम पाहिले आहे. १९९९मध्ये सुधीर जोशी यांनी आजारपणामुळे सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतली होती.