भल्या पहाटे मतदान करण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आला वाईट अनुभव, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 12:28 IST2026-01-15T12:28:11+5:302026-01-15T12:28:59+5:30
प्रकाश बोरगावकर आणि त्यांचे जेष्ठ सहकारी गुरुवारी भल्या पहाटे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी दाखल झाले. ज्या मतदान केंद्रावर बोरगावकर आणि सहकारी दाखल झाले, त्या केंद्रावरील यादीमध्ये नाव एकाचे आणि फोटो दुसऱ्याचा अशी स्थिती होती. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यादीमध्ये नाव मिळेना झाले.

भल्या पहाटे मतदान करण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आला वाईट अनुभव, नेमकं काय घडलं?
मुंबई : महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून गुरुवारी पहाटेपासूनच आपल्या मतदारांना घराबाहेर काढत मतदान करण्यासाठीचे आवाहन केले जात असतानाच दुसरीकडे मात्र वडाळा येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक प्रकाश बोरगावकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना वडाळा येथील मतदान केंद्रावर सकाळी सकाळीच वाईट अनुभव आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रकाश बोरगावकर आणि त्यांचे जेष्ठ सहकारी गुरुवारी भल्या पहाटे मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी दाखल झाले. ज्या मतदान केंद्रावर बोरगावकर आणि सहकारी दाखल झाले, त्या केंद्रावरील यादीमध्ये नाव एकाचे आणि फोटो दुसऱ्याचा अशी स्थिती होती. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यादीमध्ये नाव मिळेना झाले.
दरम्यानच्या काळात ॲपवर मात्र त्यांनी चेक केले असता तेथे मात्र व्यवस्थित माहिती मिळत होती. सकाळी किमान ४५ मिनिटं मतदार यादीमध्ये नाव शोधताना या सगळ्या जेष्ठ नागरिकांची तारांबळ उडाली. ४५ मिनिटं नाव शोधून देखील सापडत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप झाला. भल्या पहाटे मतदान करण्यासाठी आलो असताना देखील या पद्धतीने मनस्ताप होत असेल तर मतदान होणार कसे ?असे म्हणत बोरगावकर यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान याच काळामध्ये त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांची नावे दुसऱ्या मतदान केंद्रातल्या यादीवर आहेत आणि मतदान केंद्रात बदल झाला आहे, अशी माहिती देण्यात आली. त्यानुसार त्यांनी संबंधित केंद्रावर दाखल होत मतदान केले. मात्र ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रशासन केल्या कित्येक दिवसांपासून मतदानाची व्यवस्था चांगली आहे, असे सांगत होते त्याच प्रशासनाकडून भल्या पहाटे त्यांना वाईट अनुभव आल्याने मतदान केल्यानंतर संबंधितांनी नाराजी व्यक्त केली.