लालबागच्या जैन मंदिरात पावणे दोन कोटींची चोरी; पळून जाणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशात फिल्मी स्टाईल अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 10:33 IST2026-04-03T10:32:51+5:302026-04-03T10:33:20+5:30

सुरक्षारक्षकाने मंदिरातील दागिन्यांवर मारला डल्ला; मध्य प्रदेशातून पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Security Guard Arrested for Stealing Ornaments Worth 1.75 Crore from Lalbaug Jain Temple | लालबागच्या जैन मंदिरात पावणे दोन कोटींची चोरी; पळून जाणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशात फिल्मी स्टाईल अटक!

लालबागच्या जैन मंदिरात पावणे दोन कोटींची चोरी; पळून जाणाऱ्या आरोपीला मध्य प्रदेशात फिल्मी स्टाईल अटक!

मुंबई : लालबागच्या अविघ्न पार्क संकुलातील जैन मंदिरात पावणे दोन कोटी रुपयांचे दागिने चोरणाऱ्या सुरक्षारक्षकाला मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली. काळाचौकी पोलिसांनी ४८ तासांत आरोपीला ताब्यात घेत चोरलेला हिरेजडीत मुद्देमाल हस्तगत केला आहे.

संकुलातच मुनीसुरत स्वामी श्वेतांबर मूर्तिपूजक जैन संघ ट्रस्टचे मंदिर आहे. त्यातील भगवान सिमंदर यांच्या संगमरवरी मूर्तीवर पावणे दोन कोटींचे सोन्याचे, हिरेजडीत दागिने होते. त्यावर जितेंद्रची नजर पडली. पहाटे पाच ते रात्री नऊ या वेळेत हे मंदिर सुरू असते. त्याने सर्व माहिती घेत रेकी करून ३० मार्चच्या मध्यरात्री तीनच्या सुमारास मंदिराचा कडीकोयंडा तोडून दागिने चोरून पसार झाला. पहाटे पुजाऱ्याला दागिने चोरी झाल्याचे समजताच खळबळ उडाली. त्याने काळाचौकी पोलिसांना कळवले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस उपआयुक्त आर. रागसुधा यांनी तातडीने चार ते पाच विशेष पथके तयार केली. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे यांच्या तपास पथकाने शोध सुरू केला.

३०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गुन्हे शाखेकडून तपासणी 

परिसरातील सुमारे २५० ते ३०० सीसीटीव्हींचे फुटेज तपासले असता सुरक्षारक्षक जितेंद्रची माहिती समजली. तो मध्य प्रदेशचा रहिवासी असल्याने पथकाने तेथे धाव घेतली. दरम्यान, आरोपीचा नेमका ठावठिकाणा शोधणाऱ्या पथकास जितेंद्र एका नातेवाइकाच्या घरी लपल्याचे समजले. पोलिसांनी तेथे धाव घेताच त्याने घराच्या छतावरून उड्या मारत पळ काढला. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने त्याचा पाठलाग करत त्याला अटक केली.

विविध पोलिस ठाण्यात १७ गुन्ह्यांची नोंद 

जितेंद्र नागाईच (३४) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात मध्य प्रदेश राज्यात चोरी, लूटमार, अवैधरीत्या शस्त्र बाळगणे असे एकूण १७ गुन्हे नोंद आहे. दोन महिन्यांपूर्वीच तो यातील एका गुन्ह्यातून जामीनावर मुक्त झाला होता. गंभीर गुन्हेगारी पार्श्वभूमी असूनही मीरा रोडच्च्या सुरक्षारक्षक २ पुरवणाऱ्या एजन्सीमार्फत महिन्याभरापूर्वी आरोपी जितेंद्र याला सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त केले होते. जितेंद्र याच्यावर दाखल गुन्ह्यांत त्याचे जीतन, बंटी, पंडित अशी नावे आहेत.

Web Title : लालबाग जैन मंदिर चोरी: मध्य प्रदेश में सुरक्षा गार्ड गिरफ्तार

Web Summary : लालबाग के जैन मंदिर से ₹1.75 करोड़ के गहने चुराने के आरोप में एक सुरक्षा गार्ड को मध्य प्रदेश में गिरफ्तार किया गया। पुलिस ने 48 घंटों के भीतर चोरी का माल बरामद कर लिया। आरोपी पर पहले से ही 17 आपराधिक मामले दर्ज हैं।

Web Title : Lalbaug Jain Temple Theft: Security Guard Arrested in Madhya Pradesh

Web Summary : A security guard was arrested in Madhya Pradesh for stealing ₹1.75 crore worth of jewelry from Lalbaug's Jain temple. Police recovered the stolen goods within 48 hours. The accused has 17 prior criminal cases against him.