एमएमआरडीएच्या चित्ररथाला संचलनामध्ये दुसरे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 05:21 IST2019-01-23T05:21:18+5:302019-01-23T05:21:28+5:30

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये सहभागी झालेल्या चित्ररथास शासनातर्फे दुसरे पारितोषिक मिळाले.

Second prize in the development of MMRDA pictogram | एमएमआरडीएच्या चित्ररथाला संचलनामध्ये दुसरे बक्षीस

एमएमआरडीएच्या चित्ररथाला संचलनामध्ये दुसरे बक्षीस

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिन संचलनामध्ये सहभागी झालेल्या चित्ररथास शासनातर्फे दुसरे पारितोषिक मिळाले.
चित्ररथावर एमएमआरडीएने मुंबई मेट्रो आणि मुंबई पारबंदर प्रकल्पाची ३ डी प्रतीकात्मक झलक सादर केली होती. या संकल्पनेला ‘मुंबईकरांचा प्रवास सुखाचा’ अशी टॅगलाइन दिली होती. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे यांनी एमएमआरडीएतर्फे या पारितोषिकाचा स्वीकार केला. या चित्ररथ स्पर्धेत कृषी,पशुउद्योग आणि मत्स्यव्यवसाय विभागास पहिला, तर महसूल व वनविभाग खात्याला तिसऱ्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

Web Title: Second prize in the development of MMRDA pictogram