पडसलगीकर यांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2018 06:16 AM2018-12-02T06:16:43+5:302018-12-02T06:17:07+5:30

राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना अपेक्षेप्रमाणे तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली.

Seasonal increase in the time of Pansalgikar | पडसलगीकर यांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब

पडसलगीकर यांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब

Next

मुंबई : राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना अपेक्षेप्रमाणे तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली. आता २८ फेबु्रवारीपर्यंत त्यांच्याकडे राज्याची धुरा असेल. दोन टप्प्यांत सलग सहा महिने मुदतवाढ मिळणारे गेल्या काही वर्षांतील ते पहिलेच पोलीस महासंचालक आहेत.
१९८२च्या आयपीएसच्या बॅचचे अधिकारी असलेले पडसलगीकर हे ३० जूनपासून राज्य पोलीस दलाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ३१ आॅगस्टला ते निवृत्त होत असताना त्यांना राज्य सरकारने पहिल्यांदा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. ती शुक्रवारी संपल्यानंतर त्यांना पुन्हा तीन महिने वाढवून दिले.

Web Title: Seasonal increase in the time of Pansalgikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस