Join us
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात शाळांना ५ दिवस सुट्टी हवीच, मनसेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 15:26 IST

गणेशोत्सवासाठी ठाणे, मुंबई परिसरातील पालक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोकणासह राज्यातील अनेक भागात असल्यामुळे गावी जात असतात.

मुंबई : दोन वर्षाच्या कालावधीनंतर कोरोना महामारीचे संकट दूर झाल्यामुळे शासनाने हटविलेल्या निर्बंधामुळे यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवात सर्व शाळा व महाविद्यालयांना ५ दिवस सुट्टी जाहीर करावी तसेच या काळात कोणत्याही, परीक्षा अथवा प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येऊ नये अशा प्रकारच्या सूचना सर्व शाळांच्या व्यवस्थापनांना करावे, याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रमुख संघटक चेतन पेडणेकर यांनी शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांना निवेदन दिले.

गणेशोत्सवासाठी ठाणे, मुंबई परिसरातील पालक विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोकणासह राज्यातील अनेक भागात असल्यामुळे गावी जात असतात. शिक्षण उपसंचालकांनी तात्काळ सर्व शाळांना उत्सव काळात सुट्ट्यांबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याबाबत सर्व शाळांना निर्देश देण्यात येतील असे सांगितल्याची माहिती पेडणेकर यांनी दिली.

टॅग्स :शाळाविद्यार्थीगणेशोत्सव