स्किझोफ्रेनियाग्रस्त मातेकडून मुलाचा खून; मुलीने फोन करून वडिलांना कळवली घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 06:47 IST2025-01-11T06:46:46+5:302025-01-11T06:47:14+5:30
वांद्रे पूर्व येथील धक्कादायक प्रकार

स्किझोफ्रेनियाग्रस्त मातेकडून मुलाचा खून; मुलीने फोन करून वडिलांना कळवली घटना
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वांद्रे पूर्व येथील एका स्किझोफ्रेनियाग्रस्त मातेने आपल्या दहा वर्षांच्या मुलाचा वायरने गळा आवळून खून केला. पोलिसांनी मातेला ताब्यात घेतले आहे.
उत्पादन शुल्क विभागात सहायक सचिव पदावर काम करणारे रवींद्र आवटे (४४) वांद्रे पूर्वेतील गव्हर्नमेंट कॉलनीत राहतात. त्यांची पत्नी अभिलाषा (३६) ही स्किझोफ्रेनियाग्रस्त आहे. त्यांना १४ वर्षांची मुलगी आणि १० वर्षांचा मुलगा आहे. गुरुवारी अभिलाषा यांना काही कारणास्तव राग आला. त्यांनी रागाच्या भरात सर्वेशला बेडरूममध्ये ओढत नेले. आतून दरवाजा बंद करत मोबाइल चार्जिंगच्या वायरने त्याचा गळा आवळला. त्यात सर्वेशचा जागीच मृत्यू झाला.
मुलीने वडिलांना फोन करून ही घटना कळवली. खेरवाडी पोलिसांनी अभिलाषा यांना अटक केली असून, त्या खरोखरच स्किझोफ्रेनियाग्रस्त आहेत किंवा कसे, याचा तपास करत आहेत. या घटनेमुळे वांद्रे परिसरात खळबळ उडाली आहे.