Mumbai Crime: मुंबई हादरली! लग्नास नकार देताच प्रेयसीचं रौद्ररुप; झाेपलेल्या मुलांच्या शेजारीच प्रियकराच्या गुप्तांगावर केले वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:20 IST2026-01-02T10:14:23+5:302026-01-02T10:20:52+5:30

Santacruz Crime: मुंबईत महिलेने प्रियकराच्या गुप्तांगावर वार करून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Santacruz woman launched a life-threatening attack on her boyfriend she stabbed him in the genitals and then fled the scene | Mumbai Crime: मुंबई हादरली! लग्नास नकार देताच प्रेयसीचं रौद्ररुप; झाेपलेल्या मुलांच्या शेजारीच प्रियकराच्या गुप्तांगावर केले वार

Mumbai Crime: मुंबई हादरली! लग्नास नकार देताच प्रेयसीचं रौद्ररुप; झाेपलेल्या मुलांच्या शेजारीच प्रियकराच्या गुप्तांगावर केले वार

Mumbai Crime:  सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत होत असतानाच मुंबईच्या सांताक्रूझ (पूर्व) परिसरात एक थरारक घटना उघडकीस आली आहे. लग्नासाठी तगादा लावणाऱ्या एका २५ वर्षीय महिलेने आपल्या ४४ वर्षीय प्रियकराला नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनच्या बहाण्याने घरी बोलावले आणि संधी मिळताच त्याच्यावर चाकूने खुनी हल्ला केला. या हल्ल्यात महिलेने प्रियकराच्या गुप्तांगावर वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे. वाकोला पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी महिला सध्या फरार आहे.

सात वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्नाचा हट्ट

मिळालेल्या माहितीनुसार, जोगिंदर लखन महातो (४४) आणि कांचनदेवी राकेश महातो (२५) यांचे गेल्या ६-७ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. जोगिंदर हा कांचनदेवीच्या वहिनीचा भाऊ आहे. दोघेही विवाहित असून त्यांना प्रत्येकी दोन मुले आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून कांचनदेवी जोगिंदरवर त्याच्या पत्नीला सोडून आपल्याशी लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. याच कारणावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते.

बिहारहून परतताच रचला कट

लग्नाच्या दबावामुळे त्रस्त झालेला जोगिंदर नोव्हेंबर २०२५ मध्ये आपल्या मूळ गावी बिहारला निघून गेला होता आणि त्याने कांचनदेवीशी संपर्क तोडला होता. मात्र, कांचनदेवीने त्याला सतत फोन करून मुंबईत परतण्यासाठी धमकावले. १९ डिसेंबर रोजी जोगिंदर मुंबईत परतला. २४ डिसेंबर रोजी झालेल्या भेटीत त्याने पुन्हा एकदा आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा हवाला देत लग्न करण्यास असमर्थता दर्शवली. हाच नकार कांचनदेवीच्या रागाला कारणीभूत ठरला.

नववर्षाच्या स्वागताच्या बहाण्याने बोलावले घरी

१ जानेवारी २०२६ च्या पहाटे दीडच्या सुमारास, जोगिंदर कामावरून घरी परतत असताना कांचनदेवीने त्याला फोन केला. "नवीन वर्ष आहे, घरी ये आपण मिळून  खाऊ आणि सेलिब्रेशन करू," असे आमिष तिने त्याला दाखवले. जोगिंदर तिच्या घरी पोहोचला तेव्हा तिची दोन लहान मुले दुसऱ्या खोलीत झोपलेली होती.

दोघांमध्ये बोलणं सुरू असतानाच अचानक कांचनदेवीने धारदार चाकूने जोगिंदरवर हल्ला चढवला. संतापलेल्या महिलेने त्याच्या गुप्तांगावर वार केले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला. जखमी अवस्थेत जोगिंदरने तिथून कसाबसा पळ काढला आणि आपले घर गाठले. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या वडिलांना पाहून मुलाने त्यांना तातडीने सांताक्रूझमधील व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच वकोला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश खांडरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला कांचनदेवी विरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गंभीर दुखापत करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे याखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी महिला आपल्या मुलांसह फरार झाली असून, पोलीस पथके तिचा शोध घेत आहेत. 

Web Title : मुंबई में सनसनी: शादी से इनकार पर प्रेमिका ने प्रेमी के गुप्तांग पर किया हमला

Web Summary : मुंबई: शादी से इनकार करने पर एक महिला ने अपने प्रेमी के गुप्तांग पर हमला कर दिया, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गया। घटना सांताक्रूज़ (पूर्व) में हुई। पुलिस ने फरार महिला के खिलाफ मामला दर्ज कर लिया है।

Web Title : Mumbai Shaken: Woman Attacks Lover's Genitals After Marriage Rejection

Web Summary : Mumbai: A woman attacked her lover's genitals after he refused to marry her, injuring him severely. The incident occurred in Santacruz (East). Police have registered a case against the absconding woman, who is also a mother.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.