मुंबई - गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले उद्धवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी त्यांच्या भांडूप निवासस्थानी भेट घेतली. संजय राऊत लवकरच मैदानात दिसतील. नुसते दिसणार नाहीत तर तलवार घेऊन मैदानात असतील, असे उद्धव ठाकरे यांनी भेटीनंतर सांगितले.
राऊत यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गेल्या काही दिवसांपासून घराबाहेर पडणे बंद केले आहे. सध्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचे बिघाड झाल्याने उपचार सुरू आहेत. यातून लवकरच बाहेर पडेन, असे राऊत यांनी सोशल माध्यमावर सांगितले होते. मात्र, १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ते शिवाजी पार्क येथे आले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी दुपारी दोनच्या सुमारास राऊतांची भेट घेतली.
आ. सुनिल राऊत यांना प्रकृतीबद्दल विचारायचोप्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले, हल्ली मी संजय राऊत यांना फोन करून त्रास देत नाही. त्यांचे बंधू आ. सुनील राऊत यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारतो. खूप दिवसांपासून त्यांना भेटायचे होते. आज त्यांची भेट घेऊन चांगले वाटले. तत्पूर्वी विधान परिषदेचे आ. अनिल परब यांनीही सकाळी राऊतांची भेट घेतली.
Web Summary : Uddhav Thackeray visited Sanjay Raut, who has been unwell. Thackeray stated Raut will soon be back in action, armed and ready. Raut has been resting on doctor's advice but made an appearance at Balasaheb Thackeray's memorial.
Web Summary : उद्धव ठाकरे ने अस्वस्थ संजय राऊत से मुलाकात की। ठाकरे ने कहा कि राऊत जल्द ही पूरी तैयारी के साथ वापस आएंगे। डॉक्टरों की सलाह पर राऊत आराम कर रहे हैं, लेकिन बालासाहेब ठाकरे के स्मारक पर दिखाई दिए।